मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी कोरची येथील आठवडी बाजार होता. परंतु कोरची ते कुरखेडा महामार्गावर एसटी महामंडळाच्या बस फेऱ्या मोजक्याच असल्याने प्रवासी मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत होते. दुपारी कोरची वरून दहा प्रवाशांना घेऊन एमएच ०४,बी क्यू १९२४ ही क्रूजर गाडी कुरखेडाकडे भरधाव वेगाने जात असताना मोहगाव येथील वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोहगाव येथील सबीलाल भारत सोरी (५७) यांच्या सीजी (08,एफ 3217) क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
जखमींमध्ये नामदेव वासुदेव तुलावी (28 वर्षे) रा.लव्हारी, उसन मारुती लाडे (52) रा.कऱ्हाडी, जयसिंग नवलसिंग फुलकवार (24) रा. पांडूटोला, सोनल नर्सिंग फुलकवार (03 वर्ष),रा.पांडू टोला, रेशमी रवींद्र मडावी (35 वर्ष) रा.बेडगाव, राशी रवींद्र मडावी (9वर्ष) रा. बेळगाव, सुरेखा हिरा निकोडे (32 वर्ष) रा.बेडगाव यांच्यावर कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. कोरची पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला.
वाचाः जळगावकारंमध्ये खळबळ! सायंकाळी आकाशात दिसली रहस्यमय वस्तू; VIDEO पाहून तुम्हीही गोंधळाल
जखमींमध्ये तीन चिमुकल्यांसह सहा महिलांचा समावेश आहे. या अपघातात क्रुझरमधील १० प्रवासी जखमी झाले त्यात तीन चिमुकल्या बालकांचा आणि सहा महिला व एक पुरुषाचा समावेश होता. त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला. योग नामदेव तुलावी (06 महिने) हा आपल्या आईसोबत पड्यालजोब येथून लग्न समारंभातून कोरचीवरून लवारीला जात होता. त्याच्या डोक्याला जबर मार लागला तर ०६ महिन्यांची गरोदर माता अंजना रोशनी मडावी (26 वर्ष) रा.पड्यालजोब,पूजा नामदेव तुलावी (25 वर्ष) रा.लव्हारी या तिघांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
वाचाः लाल किल्ल्यावर शिवजयंती का नाही? परवानगी नाकारल्याने वादंग, प्रकरण कोर्टात पोहोचलं
दुचाकीस्वार चेंडूसारखा उडाला
या अपघातात क्रूजर गाडी चालक विजय देशमुख याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि वळणावर दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की मोटर सायकलस्वार चेंडूसारखा हवेत उडून महामार्गावरून वीस ते पंचवीस फूट दूर फेकला गेला. त्याने दुचाकीस्वाराने हेल्मेटही घातलेले नव्हते त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर क्रूजर वाहन दोन कोलांट्या खाऊन महामार्गापासून पंधरा फुटावर जाऊन कोसळले. क्रुझरचा चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
वाचाः मुंबईकरांना मोठा दिलासा; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘या’ पुलाच्या दोन मार्गिका लवकर खुल्या करण्याचे आदेश