आयएफएस आरुषी मिश्राने तिचे शालेय शिक्षण उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून पूर्ण केले आहे. तिने आयसीएसई बोर्डातून दहावीच्या परीक्षेत ९५.१४ टक्के आणि बारावीला बोर्डाच्या परीक्षेत ९१.२ टक्के गुण मिळवले. त्यानंतर आयआयटी रुरकी येथून २०१४ च्या बॅचमधून बी.टेक केले. यानंतर आरुषीने सरकारी नोकरीसाठी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
आयएफएस आरुषी मिश्राने यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंगची मदत घेतली. तिने विषयनिहाय टेस्ट सिरीज आणि अभ्यासाचे साहित्य गोळा केले होते. परीक्षेच्या चांगल्या तयारीसाठी तिनी अनेक मॉक टेस्ट दिल्या होत्या. यूपीएससी परीक्षेत अपयश मिळाल्यानंतर तिने कोचिंगमध्ये शिकवायला सुरुवात केली. यासोबतच वृत्तपत्रांमध्ये नोकरी शोधत असे.
आयएफएस आरुषी मिश्रा हिने यूपीएससीच्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (IFoS) परीक्षेत २०१८ मध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता. याआधी यूपीएससी परीक्षेत तिला २२९ रँकसह आयआरएस पद देण्यात आले होते.
दरम्यान, उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १६ वी रँक आणि डीएसपी पद मिळाले. इथपर्यंतचा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता, पण तिने हार मानली नाही. आणि प्रत्येक अपयशानंतर दुप्पट मेहनत करून तयारी केली.
सुरुवातीला इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अभ्यास साहित्यातून तिने अभ्यास केला नाही. त्यामुळे तिच्या कामगिरीवरही परिणाम झाला.या दरम्यानच्या काळात समाजाच्या दबावालाही सामोरे जावे लागले. असे असले तरी आरुषीला घरच्यांचा खूप पाठिंबा मिळाला.
आरुषीने यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी काही खास टिप्स शेअर केल्या आहेत. टॉपर्सची रणनीती समजून घेऊन तुमचा अभ्यासाचा आराखडा बनवा. वेबसाइटवर उपलब्ध शैक्षणिक YouTube व्हिडिओ आणि अभ्यास सामग्रीवरून नोट्स तयार करा. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी दररोज ३० मिनिटे ध्यान आणि व्यायाम करा. जास्तीत जास्त मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. तसेच कोचिंग आणि स्टडी मटेरियलच्या अधिक पर्यायांमुळे गोंधळ वाढतो असे आरुषी सांगते.