साताऱ्यात २० वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळला, प्रेम प्रकरणातून हत्येचा संशय; शहरात खळबळ

सातारा : वाई तालुक्यातील परखंदीच्या शिवारात आज सकाळी अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला. ही बातमी पोलिसांना मिळताच वाई पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आहेत. मृतदेहाची ओळख पोलिसांनी पटवली असून हत्या झालेला तरूण हा खानापूर येथील अभिषेक जाधव (वय २०) याचा असल्याचं समोर आलं आहे.

घटनास्थळी वाईच्या डीवायएसपी डॉ. शीतल जानवे खराडे यांच्यासह पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेमुळे वाई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून या तरूणाची हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, खानापूरमध्ये देखील तणावाचं वातावरण झालेलं आहे.

मला माझ्या बाबाचा खूप अभिमान; सत्यजित तांबेंच्या लेकीकडून बापाचं गोड कौतुक

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी परखंदी गावातील काही नागरिक हे शेताकडे जात असताना त्यांना एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही बाब लगेच वाई पोलिसांना सांगितली. वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव पवार, डीबी पथकाचे विजय शिर्के, श्रावण राठोड, सपोनी आशिष कांबळे, किरण निंबाळकर, अमित गोळे, प्रसाद दुदुस्कर यांच्यासह सर्व टीम घटनास्थळी पोहोचली.

त्यांनी मृतदेहाबाबत चौकशी केली असता व काही मृतदेहाच्या जवळील कागदपत्रावरून मृत तरूण खानापूर येथील अभिषेक जाधव असल्याचं समोर आलं. मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी सातारा येथे नेण्यात आला. मात्र, तरूणाची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खानापूर येथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. तेथेही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मात्र, अद्यापही या हत्येच्या प्रकरणातील संशयतांची नावे निष्पन्न झालेली नाहीत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर हेही दाखल झाल्याचे समजते. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख हे घटनास्थळी जाण्यासाठी रवाना झाले आहेत.

IND vs AUS: कोण आहे भारतीय संघातला राजकुमार? नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडणार

Source link

Satara Crime Newssatara wai parakhandi murder newssatara wai parakhandi youth murder newssatara youth murder newsसातारा क्राईम बातम्यासातारा तरूणाची हत्या बातम्यासातारा वाई परखंदी तरूणाची हत्या बातम्यासातारा वाई परखंदी मर्डर बातम्या
Comments (0)
Add Comment