वाचा: Bluetooth डिव्हाइसशी कनेक्ट होत नसेल तर बदला ‘या’ सेटिंग्स
Oppo Reno 8T 5G चे स्पेसिफिकेशन्स:
नवीन 5G Oppo फोन १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.७-इंचाचा फुल HD+ वक्र OLED डिस्प्ले दाखवतो, जो ९५० nits च्या कमाल ब्राइटनेससह येतो. हे 8GB LPDDR4X रॅमसह ऑक्टा-कोर 6nm स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. फोनमध्ये ColorOS 13.0 देण्यात आला आहे. कॅमेरा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, २ MP डेप्थ सेन्सर आणि २ MP मॅक्रो सेन्सर १०८ MP मुख्य सेन्सरसह उपलब्ध आहेत. ३२ MP फ्रंट कॅमेरा असलेल्या या फोनची ४८०० mAh क्षमतेची बॅटरी ६७ W SuperVOOC चार्जिंगसाठी सपोर्टेड आहे. या चार्जिंग स्पीडमुळे केवळ ४४ मिनिटांत फोन पूर्णपणे चार्ज करण्याचा कंपनीचा दावा आहे.
वाचा: OnePlus चा स्मार्टफोन खरेदी करायचा करायचाय? पाहा ही डील, मिळतोय मोठा ऑफ
Oppo Reno 8T चे स्पेसिफिकेशन्स:
4G कनेक्टिव्हिटी असलेल्या या मॉडेलमध्ये ९० Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह ६.४३ -इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे. MediaTek Helio G99 प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये 8GB LPDDR4X रॅम आहे. यामध्ये Android 13 वर आधारित ColorOS 13.0 सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. डिव्हाइसच्या मागील पॅनलमध्ये २ MP सेकंडरी मायक्रो सेन्सर आणि २MP खोली सेन्सरसह १०० MP मुख्य कॅमेरा सेन्सर आहे. यात ३२ MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. फोनच्या मोठ्या ५००० mAh बॅटरीला Oppo ने ३३ W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. याच्या मदतीने फोन फक्त ३० मिनिटांत ५० % चार्ज होऊ शकतो.
नवीन स्मार्टफोनची ही किंमत:
Oppo चे दोन्ही नवीन डिव्हाइस नुकतेच व्हिएतनाममध्ये लाँच करण्यात आले आहेत. जेथे Oppo Reno 8T 5G ची किंमत बेस व्हेरिएंटसाठी ९,९९०,००० व्हिएतनामी डॉलर्स (सुमारे ३५,००० रुपये) ठेवण्यात आली आहे. तर Oppo Reno 8T ची सुरुवातीची किंमत कंपनीने ८,४९०,००० व्हिएतनामी डॉलर्स (सुमारे २९,८०० रुपये) ठेवली आहे.
वाचा: WhatsApp ने बॅन केले ३६ लाखांहून अधिक भारतीय अकाउंट, हे आहे कारण