अटॅच बाथरूमची साफसफाई
तुमच्या घरातील खोलीला लागूनच बाथरूम असेल तर त्याच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. खोलीला जोडलेले बाथरूम कधीही अस्वच्छ राहू देऊ नये. अन्यथा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढेल आणि तुम्ही गरीब व्हायला वेळ लागणार नाही. यासोबत असेही मानले जाते की, तुमच्या घरातील बाथरूम अस्वच्छ राहिल्यास घरातील सदस्यांना झोपेसंबंधी अडचणी येऊ शकतात. एवढेच नाही तर पती-पत्नीच्या नात्यावरही याता परिणाम होतो.
या गोष्टींमुळे वाढते नकारात्मकता
जर तुमच्या घरामधील प्रत्येक खोलीत बाथरुम जोडलेले असेल तर त्यांच्या देखभालीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. टॉयलेट सीट तुटलेली नसावी आणि घाण नसावी हे लक्षात ठेवा. याशिवाय बाथरूममधील नळही टपकू नये. बाथरुमचा दरवाजाही तुटलेला नसावा. यासोबतच शॅम्पूच्या रिकाम्या बाटल्या किंवा इतर कोणत्याही गोष्टी बाथरूममध्ये पडू देऊ नयेत याचीही काळजी घ्यावी. या सर्व गोष्टींमुळे तुमच्या घरातील नकारात्मकताही वाढते.
झोपण्याच्या दिशेची घ्या अशी काळजी
जर तुमच्या बेडरूमला लागून बाथरूम असेल तर लक्षात ठेवा तुमचे दोन्ही पाय बाथरूमच्या दिशेने नसावेत. असे झाले तर तुमच्या घरात पती-पत्नीमध्ये खूप भांडण होऊ शकतात. झोपण्यासाठी सर्वात योग्य दिशा म्हणजे डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे असावेत. जर तुम्हाला बाथरूमच्या दिशेने पाय करण्याशिवाय पर्याय नसेल, तर लक्षात ठेवा की बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. यासोबतच हेही लक्षात ठेवा की, तुमचा बेड बाथरूमच्या भिंतीला लागून नसावा.
हे लावायला विसरू नका
असे अनेकदा घडते की बाथरूम वापरल्यानंतर लोक टॉयलेट सीटचे झाकण लावत नाहीत. बहुतांश घरात झाकण उघडेच असते. हे पूर्णपणे चुकीचे आहे. असे म्हणतात की, जर तुमच्या घरात टॉयलेट सीटचे झाकण उघडे ठेवले तर धनहानी कोणीही थांबवू शकत नाही.
अटॅच बाथरूमचा रंग
जर तुमच्या खोलीत बाथरूम असेल तर लक्षात ठेवा की, बाथरूमच्या भिंतीवर आणि खाली असलेल्या टाइल्स या फिकट रंगाच्या वापराव्यात. बाथरूमच्या भिंतीचा रंग आणि दरवाजाचा रंगही गडद नसावा. यामध्ये तुम्ही आकाशी, क्रीम किंवा हलका जांभळा रंग वापरू शकता. बाथरूममध्ये चुकूनही काळा किंवा तपकिरी रंग वापरू नका.
अशी करा बाथरूमची नकारात्मकता दूर
तुमच्या घरात अटॅच बाथरूम असेल तर त्याची नकारात्मकता दूर करण्यासाठी काचेच्या भांड्यात जाड सैंधव मीठ घ्या. दर आठवड्याला हे मीठ बदलत राहा. बाथरूममध्ये मीठ फ्लश करा आणि पुन्हा दुसरे मीठ घ्या. असे केल्याने बाथरूममधील सर्व प्रकारचे दोष दूर होतात.