गलती से मिस्टेक! पठाण पाहताना या ७ चुका दिसल्या का? लॉजिक पाहून डोकं आपटाल
पाउलो कोएल्होने शाहरुख खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पठाण या चित्रपटाच्या शानदार यशानंतर ट्विटरवर त्याचे कौतुक केले आहे. ब्राझिलियन कादंबरीकार असलेल्या पाउलोने अभिनेत्याने शेअर केलेला व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख आपल्या घरातील बाल्कनीतून बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांचे आभार मानत आहे.
या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना पाउलो कोएल्होने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘राजा, महापुरुष, मित्र. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तम अभिनेता. (पश्चिमेकडील लोक जे त्याला ओळखत नाहीत त्यांच्यासाठी मी ‘माय नेम इज खान पाहावा असे सुचवतो).’ शाहरुखचा हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. पाउलोच्या मते, हा चित्रपट किंग खानच्या सर्वोत्तम कामगिरीपैकी एक आहे. पाउलोच्या या ट्वीटला रिट्वीट करत शाहरुखने हृदयस्पर्शी उत्तरही लिहिले आहे. त्याने ट्विट केले की, ‘माझ्या मित्रा तू नेहमीच दयाळू असतोस. लवकरच भेटूया.’
एकाच शाळेत शिकत होते जॉन- हृतिक, ग्रुप फोटोमध्ये एक आहे मस्तीखोर तर दुसरा शांत भोळा
पाउलो कोएल्होने ‘माय नेम इज खान’ मध्ये शाहरुख खान आणि त्याच्या अभिनयाचे कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१७ मध्ये चित्रपटाला सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पाउलोने ट्विटरवर शाहरुखचे अभिनंदन केले होते. त्याने आपल्या फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला होता, ज्यामध्ये लिहिले होते- ‘मी पाहिलेला त्याचा पहिला (आणि एकमेव) चित्रपट ‘माय नेम इज खान’ होता. तो केवळ उत्कृष्ट चित्रपट नव्हता तर शाहरुख ऑस्करसाठी पात्र होता.’
ट्वीटला शाहरुखने दिलं उत्तर
यानंतर शाहरुख खानने पाउलो कोएल्हो यांचे आभार मानले. त्याने उत्तरात लिहिले, ‘खूप खूप धन्यवाद. माझा पुढचं काम तुम्हाला वैयक्तिकरित्या भेटण्याचा प्रयत्न करणं असेल. तुमच्यावर खूप सारं प्रेम आहे.’ माय नेम इज खानमध्ये शाहरुखशिवाय काजोलनेही महत्त्वाची भूमिका साकारली होती. किंग खानने आपल्या सावत्र मुलाची हत्या झाल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिजवान या ऑटिस्टिक माणसाची भूमिका केली होती. त्याला अमेरिकेत मुस्लिम असल्याबद्दल भेदभावाचा सामना करावा लागतो आणि आपण दहशतवादी नाही हे आपल्या आजूबाजूच्या लोकांसमोर सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा लागतो असे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. हा सिनेमा करण जोहरने दिग्दर्शित केला होता.