सध्या चर्चेत असलेले चॅट जीपीटी नक्की काय ? पाहा चॅट जीपीटीचे फायदे आणि तोटे

नवी दिल्ली: ChatGPT AI: चॅट जीपीटी एक कृत्रिम बुद्धिमत्ता साधन असून काही लोक याला दुसरे Google देखील म्हणत आहे. तरुण आणि तांत्रिक क्षेत्रातील जाणकार आजकाल सोशल साईट्सवर यावर सतत चर्चा करताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे त्यात २०२१ पूर्वी फक्त डेटा फीड आहे. अशात जे लोक चॅट जीपीटीला गुगलची रिप्लेसमेंट समजत आहे, त्यांना याविषयी अधिक जाणून घेण्याची आवश्यकता आहे.

वाचा: Bluetooth डिव्हाइसशी कनेक्ट होत नसेल तर बदला ‘या’ सेटिंग्स

चॅट जीपीटी म्हणजे काय?

हे जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर लँग्वेज मॉडेल आहे. जे Open AI ने विकसित केले आहे, जे सर्च बॉक्समध्ये लिहिलेले शब्द समजून घेऊन लेख, तक्ता, बातम्या, कविता अशा फॉरमॅटमध्ये उत्तर देऊ शकते. जेव्हा युजर्स ते वापरतात, तेव्हा व्याकरण दुरुस्त करते. पण, त्यात दिलेली माहिती पूर्णपणे बरोबर आहे की नाही त्याचीही फेरतपासणी होणे गरजेचे आहे.

वाचा: OnePlus चा स्मार्टफोन खरेदी करायचा करायचाय? पाहा ही डील, मिळतोय मोठा ऑफ

चॅट GPT कसे विकसित झाले ?

चॅट GPT हे ओपन एआयने विकसित केलेले नैसर्गिक भाषा प्रक्रिया मॉडेल आहे, जे पहिल्यांदा २०१८ मध्ये एका संशोधनात प्रकाशित झाले होते. हे प्रश्नोत्तरे, भाषा भाषांतर आणि परिच्छेद निर्मिती इत्यादीसाठी तयार करण्यात आले होते. चॅट जीपीटीच्या संस्थापकांबद्दल सांगायचे झाल्यास सॅम ऑल्टमन आणि एलन मस्क यांनी २०१५ मध्ये याची सुरुवात केली. मस्कने सुरुवातीच्या काळातच यातून माघार घेतली. त्यानंतर मायक्रोसॉफ्टने यात गुंतवणूक केली आणि ३० नोव्हेंबर २०२२ रोजी प्रोटोटाइप म्हणून लाँच केले.

आता लोक चॅट जीपीटीवरून अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागले आहेत. चॅट GPT त्यांना त्यांच्या स्वतःच्या फीड डेटावर आधारित प्रतिसाद देतो. त्यामुळे लोकांना फायदा होत असला तरी, लोकांच्या करिअरवर त्याचा परिणाम होणार नाही. असे गृहीत धरले जाऊ शकते, कारण, AI प्रणाली मानवी मेंदूपेक्षा उच्च क्षमतेने काही कामं करू शकतात. परंतु, त्यांच्याकडे मानवासारखीच समज आणि सर्जनशीलता नसते.

चॅट GPT चे तोटे:

चॅट GP हे लर्निंग मॉडेलसारखे असून ते फक्त फीड डेटाच्या आधारेच प्रतिसाद देऊ शकते. प्रशिक्षित डेटामध्ये फीडअसल्यास, ते संबंधित प्रश्नाच्या उत्तरात देखील दर्शविले जाऊ शकतात. ChatGPT ला मानवी मेंदूइतकी समज नाही . जर तुम्ही ते वापरत असाल तर संबंधित कन्टेन्ट तपासल्यानंतरच वापरा.

वाचा: WhatsApp ने बॅन केले ३६ लाखांहून अधिक भारतीय अकाउंट, हे आहे कारण

Source link

AI toolartificial intelligencechat gptChat GPT userswhat is ChatGPT
Comments (0)
Add Comment