याला म्हणतात उखाणा! सुमित, तूच माझा महाराष्ट्र …वनिता खरातच्या लग्नातला हा व्हिडिओ पाहाच

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत ज्या लग्नाची चर्चा सुरू होती, ते लग्न म्हणजे अभिनेत्री वनिता खरात हिचं. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत काल म्हणजे २ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्नबंधनात अडकली. वनिताच्या लग्नाला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’शोमधल्या बऱ्याच मित्र-मंडळींनी हजेरी लावली होती.

वनिता आणि सुमितवर सध्या चाहते आणि सेलिब्रिटी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसंच लग्नाचे फोटो, व्हिडिओही ही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एक व्हिडिओ विशेष चर्चेत आलाय. हा व्हिडिओ आहे, वनितानं घेतलेल्या उखाण्याचा. वनितानं भन्नाट उखाणा घेत सुमितचं नाव सर्वांना ऐकवलं.
विराट तर सगळीकडेच भारी! कोहलीच्या एका टीशर्टच्या किमतीत येईल एक नवी बाईक, किंमत पाहा
वनितानं हटके आण भन्नाट स्टाइलमध्ये घेतलेला उखाणा नेटकऱ्यांनाही प्रचंड आवडलाय.

काय आहे वनिताचा हा उखाणा?
‘टेन्शन रिलीज करायला शोधले मी फंडे सतरा, टेन्शन रिलीज करायला शोधले मी फंडे सतरा…सुमित, तूच माझा महाराष्ट्र तूच माझी हास्यजत्रा’.वनितानं घेतलेला हा उखाणा सगळ्यांनाच आवडला. व्वा..व्वा ..वा म्हणत सगळ्यांनीच जल्लोष केलाय. हा व्हिडिओ सध्या विशेष चर्चेत आलाय.


वनिताच्या लग्नसोहळ्याला महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती, त्याप्रमाणं तिचा मित्रपरिवार उपस्थित होता. वनिताच्या नवऱ्याविषयी सांगायचं झालं तर तो एक व्हिडिओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. सोशल मीडियावर तो विशेष सक्रिय असून वनितासोबतही त्याचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर आहेत.
चाहते असावे तर असेच! जॅकी श्रॉफच्या फॅन्सने केलं असं काही की तुम्हालाही अभिमानच वाटेल
गेल्या काही दिवसांपासून वनिता आणि सुमित यांच्या प्रीवेडिंग शूटमधील फोटो आणि लग्नापूर्वींच्या विधींचे फोटो व्हायरल झालो होते. तिच्या मेहंदीच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतल्यानंतर हळदीच फोटो, व्हिडिओही व्हायरल झाले होते.



Source link

vanita kharat and sumit londheVanita Kharat And Sumit Londhe Weddingvanita kharat ukhanavanita kharat ukhana videovanita kharat weddingvanita kharat wedding photosवनिता खरातवनिता खरात सुमित लोंढेसुमित लोंढे
Comments (0)
Add Comment