वंध्यत्व निवारण व उपचारांसाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर

तेज पोलीस टाइम्स – परवेज शेख

वंध्यत्व निवारण व उपचारांसाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर
(रविवारी दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी)

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयमधील डी पी यु आय व्ही एफ आणि एन्डोस्कोपी सेंटरच्यावतीने वंध्यत्व निवारण व उपचारासाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन येत्या रविवारी दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वा करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये मार्गदर्शन वंध्यत्वरोग तज्ज्ञांद्वारे करण्यात येईल.

वंध्यत्वाने ग्रस्त महिला व पुरुष यांनी वंध्यत्व निवारण व उपचारासाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी या शिबिराचे आयोजन करण्यात येईल. हे शिबीर डी पी यु आय व्ही एफ आणि एन्डोस्कोपी सेंटर, ७ वा मजला हायटेक बिल्डिंग, डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालय, पिंपरी पुणे येथे होत आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीकरिता संपर्क क्र. ०२० ६७११६४४१ / ७६२०५९८८६७ वर संवाद साधू शकता.

Comments (0)
Add Comment