वाचा: OnePlus चा स्मार्टफोन खरेदी करायचा करायचाय? पाहा ही डील, मिळतोय मोठा ऑफ
कस्टम ड्युटी शुल्कात कपात:
मोदी सरकारच्या शेवटच्या आणि पूर्ण बजेटमध्ये सीतारामण यांनी मोबाइल फोन उत्पादनासाठी काही इनपुट्सच्या आयातीवर कस्टम ड्युटी शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव दिला. त्या म्हणाल्या की, आम्ही मोबाईल फोन निर्मितीमध्ये देशांतर्गत मूल्यवर्धन वाढवण्यासाठी काही भाग आणि कॅमेरा लेन्स सारख्या इनपुटवरील कस्टम ड्युटीमध्ये सवलत देण्याचा आणि बॅटरीसाठी लिथियम-आयन सेलवरील सवलतीचे शुल्क आणखी एक वर्ष चालू ठेवण्याचा प्रस्ताव देत आहो. याशिवाय, टीव्ही पॅनेलच्या आयात शुल्कला सुद्धा २.५ टक्के कमी करण्यात येणार आहे.
वाचा: सध्या चर्चेत असलेले चॅट जीपीटी नक्की काय ? पाहा चॅट जीपीटीचे फायदे आणि तोटे
स्मार्टफोनच्या किमती कमी होणार ?
स्मार्टफोन निर्मात्यांना ग्राहकांना फायदा पोहोचवायचा नसेल तर, फोनच्या किमती कमी होणार नाहीत अशी शक्यता आहे. तर, काही कंपन्या कमी कस्टम ड्युटी चार्जेसमुळे मिळणाऱ्या फायद्यासाठी हे करू शकतात. पण, जर सर्व काही सुरळीत झाले तर, त्यांच्या किमतीही खाली येऊ शकतात.
तसेच, नवीन बजेट मध्ये शिक्षणाला टेक्नोलॉजीने जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरकार डिजिटल इंडियाच्या पहिल्या टप्प्यात शिक्षणाचे डिजिटलीकरण करण्यात मदत करणार आहे. सोबतच यांनी ५जी विकासासाठी सरकार संपूर्ण देशात जवळपास १०० लॅब्सची स्थापणा करणार आहे. यामुळे ५जी ची सेवा डेव्हलप होण्यास मदत मिळणार आहे. आता पर्यंत संपूर्ण देशात १०० हून अधिक शहरात एअरटेल आणि जिओ 5G सर्विस लाइव्ह करण्यात आली आहे.
वाचा: WhatsApp ने बॅन केले ३६ लाखांहून अधिक भारतीय अकाउंट, हे आहे कारण