पोलिसांनी चक्र फिरवताच मालेगावला हादरवणाऱ्या घटनेचं गूढ उलगडलं, संशयित आरोपीला बेड्या

नाशिक : काही दिवसांपूर्वी मालेगावातून हत्येचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेत एका महिलेचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे कोणीतरी फेकून दिले होते. अत्यंत क्रूर पद्धतीने केलेल्या या हत्येच्या घटनेने मालेगाव हादरले होते. या घटनेचा उलगडा झाला असून हत्येमागचे धक्कादायक कारण समोर आले आहे.

दहीदी गावाातील सुमनबाई भास्कर बिचकुले (वय ३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. संबंधित महिला (३० जानेवारीला ) सकाळी शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेली होती. तर, त्यांचे पती भास्कर बिचुकले शेतीमालाच्या विक्रीसाठी बाहेरगावी गेले होते. ते शेतीमालाची विक्री करून सायंकाळी घरी परतले. मात्र, त्यांना घरी आल्यावर सुमनबाई बिचुकले घरी आढळल्या नाहीत. त्यामुळं त्यांनी शोधाशोध सुरु केली. ते आधी पत्नीला शोधत त्यांच्या शेतात गेले. मात्र, त्या मिळून आल्या नाही. म्हणून त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले आणि सगळ्यांनी मिळून शोध सुरु केला.

जय जय महाराष्ट्र माझा; ऐका महाराष्ट्राचं राज्यगीत, अभिमानानं ऊर भरून येईल

भास्कर बिचुकले यांना पत्नीचा शोध घेत असताना शेतात रक्ताने माखलेले फावडे त्यांना आढळून आले. त्यानंतर शेतापासून जवळपास एक किलो मीटर अंतरावर असलेल्या जंगलात त्यांना पत्नीचे शीर, धड आणि पाय असे शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. या घटनेने एकच खळबळ उडाली. अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील नागरिक हादरले होते. हा खून नेमका कोणी केला, या बद्दल काहीच अंदाज नव्हता.

दरम्यान पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आहे. आरोपीने दागिन्यांसाठी क्रूरपणे त्यांची हत्या केली आहे. संशयित आरोपीने महिलेला शेतात एकटी असल्याचे पहिले सोबतच तिच्या अंगावर त्याला चांदीचे दागिने दिसले. हे दागिने पाहून त्याने महिलेला फरफटत जंगलात नेले. या ठिकाणी तिच्या पायावर वार केले. पायातील चांदीचे दागिने घेऊन आरोपी फरार झाला. पोलिसांच्या पथकाने त्याचा कसून तपास केला असता तो चांदीचे दागिने करंजवण येथे सोनाराकडे गेला असल्याचे कळाले. सोनाराने याची माहिती पोलिसांना दिली.

भारतीय क्रिकेटरच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी; १० लाखांच्या डीलवरून…

पोलिसांना आरोपी डोंगराळे शिवारात असल्याची माहिती मिळताच त्यांनी सापळा रचला पोलिसांना पाहताच आरोपीने तलावात उडी मारली. मात्र, दोघा पोहणाऱ्यांच्या मदतीने मोठ्या शिताफीने संशयित आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. किरण गोलाईत असं संशयित आरोपीचं नाव आहे. मात्र, केवळ दागिन्यांसाठी एवढ्या क्रूरपणे आरोपीने महिलेचा जीव घेतल्याने संतापाचे वातावरण आहे.

Explainer: अखेर सत्यजीत तांबे जिंकले आणि पटोलेही, आता काँग्रेसचं पुढे काय?

महाविकास आघाडीचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तांबेच्या प्रचारात

Source link

dahidi crime newsfarmer woman deathmalegaon crime newsmalegaon newsMalegaon News UpdateNashik newsNashik Policeनाशिक पोलीसमालेवातील त्या घटनेचा उलगडा
Comments (0)
Add Comment