WhatsApp वर डिलीट झालेला मेसेज वाचण्याची सोपी ट्रिक, पाहा

नवी दिल्लीः WhatsApp सर्वात जास्त लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. या ॲपमध्ये असे अनेक फीचर्स आहेत जे आपल्या कामी येतात. परंतु, काही त्यातील अनेक तुम्हाला माहिती नसतात. जर तुमच्या कुणी मित्राने तुम्हाला मेसेज करून डिलीट केला असेल तर त्याला तुम्ही कसे पाहू शकता. WhatsApp ने सध्या यासाठी कोणतेही फीचर आणले नाही. परंतु, यासाठी एक ॲप आहे. याद्वारे हे शक्य आहे. जाणून घ्या डिटेल्स.

अनेकदा असे होते की, WhatsApp वर कोणताही व्यक्ती मेसेज पाठवतो व लगेच डिलीट करतो. त्यामुळे तुम्हाला माहिती होत नाही की, त्याने नेमका कोणता मेसेज केला होता. फक्त चॅट बॉक्सवर लिहिलेले दिसते की, This message was deleted. चला तर जाणून घेवूया डिलीट झालेल्या मेसेजला कसे पाहू शकाल.

वाचाः Samsung Galaxy S23 सीरीज लाँच, दीड लाखाचा स्मार्टफोन iPhone 14 ला टक्कर देणार?

WhatsApp वर डिलीट झालेला मेसेज

  • एक पद्धत आहे. ज्यामुळे तुम्ही डिलीट झालेलाा मेसेज पाहू शकता. या अॅपचे नाव WhatsRemoved+ आहे. तुम्ही याला गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता.

  • सर्वात आधी तुम्ही या ॲपला डाउनलोड करा. त्यानंतर तुमच्याकडे जी परमिशन मागितली जाईल. त्याला Allow करा.

वाचाः ६ फेब्रुवारीला भारतात येतोय पोकोचा नवा स्मार्टफोन, पॉवरफुल फोनची किंमत किती?

  • आता तुम्हाला WhatsRemoved+ ॲपला ओपन करावे लागेल. त्यानंतर या ॲपला सिलेक्ट करावे लागेल. याद्वारे तुम्ही डिलीट झालेला मेसेज पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही तुमच्या WhatsApp ला सिलेक्ट करा.

  • आता एक पॉप अप येईल. त्यात Yes वर टॅप करा. यानंतर तुम्हाला सर्व मेसेज या ठिकामी मिळतील ज्या ठिकाणी WhatsApp वर पाठवलेले मेसेज डिलीट करण्यात आले आहे.

वाचाः Apple चे सीईओ टिट कुक मुंबईकरांना देणार खास भेट, केली मोठी घोषणा

Source link

read deleted whatsapp messagesWhatsApp featureswhatsapp messageswhatsapp messages auto deletewhatsapp messages hideWhatsApp update
Comments (0)
Add Comment