हा अनिरुद्ध डोक्याचा अक्षरशः भुगा करतो, मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

मुंबई- आई कुठे काय करते ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं साकारल्यामुळे प्रेक्षकही त्यांच्यावर भरभरून प्रेम करत आहेत.आई कुठे काय करते मालिकेतील कथानक सध्या अत्यंत रंजक वळणावर आलं आहे. मालिकेत अरुंधतीनं ती आशुतोषची लग्न करणार असल्याचं जाहीर करते. त्यावर कांचन,अनिरुद्ध आणि अभिषेक तिला वाट्टेल ते बोलतात.

ओरिजनल नाहीच! मराठी मालिकांना लागतो दाक्षिणात्य मालिकांचा आधार

मालिकेच्या दोन दिवसांपूर्वी प्रसारित झालेल्या भागामध्ये अनिरुद्ध अरुंधतीला वाट्टेल ते बोलताना दिसत आहे. अनिरुद्धच्या या आक्रस्ताळेपणाबाबत ही भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी अनिरुद्धबद्दल संताप व्यक्त केला आहे.


काय आहे मिलिंद गवळींची पोस्ट

आई कुठे काय करते मालिकेत मिलिंद गवळी अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारत आहे. मिलिंद यांनी ग्रे शेड असलेली ही भूमिका अत्यंत उत्तमरित्या साकारली आहे. मिलिंद यांनी अनिरुद्ध या भूमिकेच्या आक्रस्ताळ्या स्वभावाबद्दल त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘अनिरुद्ध, अरे थांब जरा थांब, किती बोलतोयस… खरंच अनिरुद्ध सारखी माणसं किती बोलतात आणि काय काय बोलतात, किती मनाला लागेल असं बोलतात, कशाचाच भान ठेवत नाही, समोरच्याला काय वाटेल? त्याला किती त्रास होईल ? त्याचं मन किती आपण दुखवतो आहोत, याचं कसलंच भान नाही या माणसाला. मग अशा माणसाची चीड नाही येणार का? बऱ्याच वेळेला तर मलासुद्धा त्याची चीड येते.’


मिलिंद यांनी पुढं लिहिलं आहे की, ‘अनिरुद्ध बोलायला लागला की माझं सुद्धा डोकं भणभण करायला लागतं. कधी तर तो इतकं विचित्र बोलतो की मला असं वाटतं की माझं डोकं फुटेल की काय. पण त्याला बोलावंच लागतं ,तो बोलला नाही तर, कसं व्हायचं? काळ्या रंगाचा ब्लॅकबोर्ड असला तरच तर त्यावर पांढरी अक्षर उमटून दिसतील ना. हा अनिरुद्ध तो ब्लॅकबोर्ड आहे.’

मल्याळी सिनेमात गिरीश कुलकर्णी, ‘थंकम’ पाहिला का?

‘बरं नमिता आणि मुग्धाने लिहिलेलं आम्हा सगळ्यांना बोलावच लागतं, न बोलून सांगतात कोणाला! बरं हा अनिरुद्ध पहिल्या एपिसोड पासूनच असाच आहे, पहिल्या एपिसोडमध्ये अरुंधतीला घराच्या बाहेर काढलं होतं त्याने आणि आतासुद्धा तेच करतोय.’


मिलिंद यांनी याच पोस्टमध्ये अशी बेताल बडबड करणारी, आक्रस्ताळी भूमिका साकारल्यानंतर मन शांत ठेवण्यासाठी ते काय करातात याबद्दल सांगितलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, ‘सांगायचा मुद्दा काय आहे की, त्यानं ही बडबड केल्यानंतर जो काही डोक्याचा भुगा होतो, तो कसा निस्तरायचा… तर शांत बसायचं. मेडिटेशन करायचं. पूर्वी एक बरं होतं.’

‘एक खूप शांत मांजर आमच्या सेटवर होती, खूपच मायाळू आणि प्रेमळ होती, तिच्याबरोबर मला खूप शांत वाटायचं, छान वाटायचं, ती जवळ येऊनच बसायची. तिच्याबरोबर माझं डोकं शांत व्हायचं. पण काय सगळ्यांनाच कुत्रे, मांजरी, पक्षी, प्राणी आवडत नाहीत. त्यांच्यापैकी एक जण तिला लांब कुठेतरी सोडून आला, का तर शूटिंगच्या मध्येमध्ये यायची म्हणून त्यांना डिस्ट्रब व्हायचं, पण मग हल्ली अनिरुद्ध खूपच डोक्यात जातो आणि बाहेर यायचं नावच घेत नाही.


दरम्यान, मिलिंद यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. मिलिंद सोशल मीडियावर खूपच सक्रीय असतात. इन्स्टाग्रामवर ते मालिकेशी संबंधित फोटो-व्हिडिओ पोस्ट करत असतात. त्याला चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात.

माझं नाव फातिमा, संसार टीकवण्यासाठी मी रडतेयं, राखींनी लोकांसमोर मांडल्या व्यथा



Source link

aai kuthe kay karteaai kuthe kay karte latest episodeaai kuthe kay karte newsMilind Gawalimilind gawali instagramआई कुठे काय करतेआई कुठे काय करते अपडेटआई कुठे काय करते मालिकामिलिंद गवळीमिलिंद गवळी इन्स्टाग्राम
Comments (0)
Add Comment