पती नववधूसारखे कपडे घालून झोपतो, मुंबईतील विवाहितेचा आरोप, सासू म्हणाली, ही तर त्याची…

मुंबई : आपला पती नववधूची वेशभूषा करुन झोपत असल्याचा आरोप मुंबईतील २० वर्षीय विवाहितेने केला आहे. नवऱ्याचं बिंग झाकण्यासाठी सासरच्या मंडळींनी मी प्रेग्नंट असल्याची आवई उठवली, नंतर माझ्या निष्काळजणीपणाने गर्भपात झाल्याचं खोटं पसरवलं. प्रत्यक्षात आमच्यात कधी शारीरिक संबंधच न आल्याने मी प्रेग्नंट होण्याचा प्रश्नच नव्हता, असा दावा विवाहितेने केला आहे. फसवणूक आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी तिने केली आहे.

मुंबईतील घाटकोपर येथील रहिवासी असलेल्या महिलेचा विवाह २०२१ मध्ये कोल्हापूर शहरातील एका तरुणासोबत झाला. तरुणीच्या कुटुंबाने पदरमोड करुन क्षमतेपेक्षा अधिक खर्च केला होता. मात्र नव्या नवरीचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण आपल्या पतीला स्त्रियांचा पोशाख करुन राहायला आवडते, असा दावा महिलेने केला. मिड-डे वर्तमानपत्राच्या वेबसाईटवर यासंदर्भात बातमी आहे.

“एका रात्री माझ्या पतीने नववधूची वेशभूषा केली; आमच्या लग्नाच्या दिवशी मी आणलेल्या किटचा वापर करून त्याने मेक-अप केला आणि माझ्यासोबत झोपायला आला. जेव्हा मी माझ्या सासूला माझ्या पतीच्या वागण्याबद्दल सांगितले, तेव्हा ती म्हणाली की ही त्याची जुनी सवय आहे” सासूचे हे उत्तर ऐकून विवाहिता अंतर्बाह्य हादरुन गेली.

याबाबत तिने आई-वडील आणि कोल्हापुरातील नातेवाईकांना सांगितल्यानंतर पती व त्याचे कुटुंबीय तिचा छळ करू लागले, असा आरोप तिने केला. त्यांनी मी गरोदर असल्याची अफवा उठवली, जेणेकरून त्यांच्या मुलाची समस्या कोणाला कळू नये. नंतर त्यांनी सर्वांना सांगितले की माझ्या निष्काळजीपणामुळे माझा गर्भपात झाला. मुळात सत्य हे आहे की आमच्यात कधीच शारीरिक संबंध नव्हते, असा दावाही तिने केला.

या अफवेबद्दल मी पतीला विचारले असता, त्याने माझ्यावर लैंगिक अत्याचार केले, माझ्या छातीवर बसला आणि मारहाण केली. त्याने माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये स्क्रू ड्रायव्हर आणि इतर गोष्टी घातल्या. त्यामुळे संसर्ग झाला आणि मला डॉक्टरांकडे नेण्यात आले. मी बरी होताच माझ्या कुटुंबियांना याविषयी माहिती दिली. आम्ही कोल्हापुरातील सदर बाजार पोलिसांशी संपर्क साधला. पण, पोलिसांनी ना गुन्हा दाखल केला ना कारवाई केली, कारण माझे सासरे श्रीमंत आहेत, असंही ती म्हणाली. गेल्या वर्षभरात आम्ही अनेकदा घाटकोपर पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवले, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही’ असे विवाहितेने सांगितले.

हेही वाचा : त्याची चिता जळत असतानाच वाईट बातमी धडकली, गावातल्याच आणखी तिघांचा अपघातात मृत्यू

“माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी” अशी मागणी महिलेच्या आईने केली आहे. “मी माझ्या मुलीचे लग्न मोठ्या आशेने केले होते. आम्ही त्या मुलाला भेटलो, पण काहीही संशयास्पद वाटले नव्हते.” असेही ती म्हणाली. दरम्यान महिलेच्या पतीने हे आरोप फेटाळून लावले असून महिला आणि तिचे कुटुंब खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा : रगडेंच्या सांचीवर लंडनच्या एडवर्डचं ‘लव्ह’, औरंगाबादेत थाटात लग्न, मिस्टर क्लेश म्हणाले…

Source link

husband dresses like womanmaharashtra crime newsmother in lawmumbai crime newsmumbai married ladymumbai woman cheatedपती महिलेसारखी वेशभूषामुंबई महिला फसवणूकमुंबई महिला सासरी फसवणूकमुंबई विवाहिता फसवणूक
Comments (0)
Add Comment