कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परशुराम घाट पुन्हा बनला धोकादायक, पाहा नेमकी स्थिती

रत्नागिरी : कोकणात मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटाच्या रुंदीकरण्याचे काम सुरू आहे. यासाठी मोठी डोंगर खोदाई करण्यात आली आहे. मात्र, याच ठिकाणी गुरुवारी पुन्हा दरड कोसळण्याची दुर्घटना घडली होती. त्यामुळे पुन्हा एकदा परशुराम घाट धोकादायक बनला आहे. या स्थितीमुळे वाहन चालक दस्तावले आहेत. तूर्तास तरी या मार्गावरील वाहतूक सुरू आहे. मुंबई-गोवामहामार्गाचे चौपदरीकरण सुरू असून या चौपदरीकरण अंतर्गत परशुराम घाटात डोंगर कटाई व सपाटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, या कामांतर्गत यापूर्वी डोंगरकटाई करताना मोठे दगड पेढे येथे वस्तीत कोसळून नुकसान झाले होते. तर गुरुवारी सकाळी परशुराम घाटात दरड कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. मात्र, काही वेळ वाहतूक खोळंबली होती.

वाहनचालकांमध्ये आहे भीतीचे वातावरण

गेल्या काही महिन्यांपासून परशुराम घाटात डोंगरकटाई व सपाटी करणाबरोबरच रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. ही कामे सुरू असताना पेढे वस्तीत दगड कोसळण्याच्या सलग घटना घडल्या होत्या. त्यामध्ये काहींच्या घरांचे नुकसान झाले होते. गुरुवारी सकाळी पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडली. ही दरड रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. नंतर ठेकेदार कंपनीने जेसीबी व पोकलेनच्या साह्याने ही दरड बाजूला केल्याने वाहतूक पूर्ववत झाली. मात्र दरडी रस्त्यावर येत असल्याने वाहन चालकांमध्ये भीतीची वातावरण आहे.

क्लिक करा आणि वाचा- विवाहित महिलेशी त्याची फेसबुकवरुन ओळख झाली, जवळीक वाढवली, नंतर महिलेबरोबर घडले ते धक्कादायकच

कोकणातील हाच परशुराम घाट पावसाळ्यात अत्यंत धोकादायक बनला होता. त्यामुळे या घाटातील वाहतूकही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. नंतर या घाटातून वाहतूक सुरू करण्यात आली. गेल्या वर्षी एप्रिल-मेच्या दरम्यान परशुराम घाट दुरुस्तीच्या कामाकरता दिवसा बंद ठेवण्यात आला होता. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर याच परशुराम घाटातील कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे. यामुळेच गुरुवारी या दरड खाली आली होती व काही काळ या मार्गावरती वाहतूक बंद करावी लागली होती.

क्लिक करा आणि वाचा- इच्छेविरुद्ध लग्न, पती १७ वर्षांनी मोठा, पत्नीने प्रियकरासाठी पतीला संपवले, पतीच्याच मोबाइलवर शोधले मार्ग

ठेकेदारांच्या चुकीमुळे घाट बनला धोकादायक- स्थानिकांचा आरोप

सुरक्षेचा उपयोग म्हणून या घाटात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र या राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात ठेकेदाराच्या चुकीमुळेच हा घाट धोकादायक झाल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे. परशुराम घाटात काम सुरू असल्याने दरडी कोसळण्याचा अलीकडे धोका राहिला आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या या परशुराम घाटातील रस्त्याचे काम अत्यंत काळजीपूर्वक व लवकरात लवकर सुरक्षित पद्धतीने करणे आवश्यक झाले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास पुन्हा याच पावसाळ्यात परशुराम घाटातील वाहतूक धोकादाय ठरू शकते.

क्लिक करा आणि वाचा- पुण्यातील येरवडा कारागृहात कैदी पिसाळला; मोक्कातील आरोपी नाना गायकवाडवर लोखंडी पत्र्याने हल्ला, चेहऱ्यावर झाला वार

Source link

Land slidingLand sliding in Parshuram GhatRatnagiri newsपरशुराम घाटात कोसळतात दरडीपरशुरामघाट धोक्याचा
Comments (0)
Add Comment