स्वामी विवेकानंद कॉलेजबाहेर गुरुवारी सायंकाळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मुद्दसीरवर चाकूने हल्ला केला होता. यात त्याचा मृत्यू झाला होता. चुनाभट्टी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला. गुन्हे शाखा युनिट ५, ६ आणि ७ यांचीही तपासाकरिता विशेष पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोरांची ओळख पटल्याने पोलिसांनी समाजमाध्यमांच्या आधारे त्यांचा मग घेण्यास सुरुवात केली. हत्येनंतर कल्याणपर्यंत पळलेले दोघे धारावीत येत आल्याची कुणकुण लागताच पोलिसांनी आदित्य व खलफम यांना अटक केली.
आदित्यचे चेंबूर परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीसोबत सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती मुद्दसीरसोबत फिरताना दिसली. समजावूनही ऐकत नसल्याने आदित्यने मुद्दसीरचा काटा काढण्याचे ठरविले. त्याने खलफम या मित्राला सोबत घेऊन गुरुवारी त्याला चेंबूरच्या सिंधी सोसायटीजवळ गाठले. दोघांनीही मुद्दसीरवर चाकूने वर केले आणि पसार झाले. यात गंभीर इजा झाल्याने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.