Samsung Galaxy S23 series: सॅमसंगचा मेगा इव्हेंट! भारतीयांसाठी प्री-बुकिंग ऑफर

नवी दिल्लीः सॅमसंगने अलीकडेच यूएस (US) येथील सॅन फ्रान्सिस्को या कार्यक्रमात आपल्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाइनअप Galaxy S23 सीरिजचे अनावरण केले आहे. सॅमसंगच्या ‘Galaxy Unpacked’ या मेगा इव्हेंटने अवघ्या जगाचे लक्ष वेधले. कंपनीचा २०२३ मधील हा पहिला मोठा लॉन्च इव्हेंट ठरला आहे. विशेष बाब म्हणजे Galaxy Unpacked हा सॅमसंगचा 2020 मध्ये कोविड-१९ महासाथीनंतरचा पहिला वैयक्तिक इव्हेंट होता. दक्षिण कोरिया-आधारित टेक कंपनीने या आधीच भारतात लॉन्च होणाऱ्या नवीन स्मार्टफोनची किंमत जाहीर केली होती. चला तर मग जाणून घेऊया सॅमसंगच्या नवीन फोनबद्दल आणि त्याच्या फीचर्सबद्दल.

भारतीयांसाठी प्री-बुकिंग ऑफर
दरम्यान, भारतातील ग्राहकांना २ फेब्रुवारीपासून ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून डिव्हाइसची प्री-बुकिंग करण्याची मुभा देण्यात आली आहे. सॅमसंग नंतरच्या काळात देखील आपले नवीनतम प्रीमियम स्मार्टफोन पाठविणे सुरू ठेवणार आहे, मात्र कंपनीने अद्याप याबाबत काहीच उघड केलेले नाही. Galaxy S23 सीरिजमधील स्मार्टफोन्समध्ये कस्टम-मेड Snapdragon 8 Gen 2 मोबाइल प्लॅटफॉर्म आहे. लक्षणीय म्हणजे Samsung Galaxy S23 Ultra मध्ये नवीन 200MP सेन्सर देण्यात आला आहे. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर ग्राहक फोनचे प्री-बुकिंग देखील करू शकतात.

रंगांच्या माध्यमातून वेधले सर्वांचे लक्ष
Samsung Galaxy S23+ हा स्मार्टफोन दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. फॅंटम ब्लॅक आणि क्रीम हे रंग ग्राहकांना आकर्षित करू शकतात. तर व्हॅनिला गॅलेक्सी S23 मॉडेलमध्ये हिरव्या रंगाचा पर्यायही असेल. दरम्यान, Galaxy S23 Ultra हा स्मार्टफोन लाल, ग्रेफाइट, लाइम आणि स्काय ब्लू या ४ रंगामध्ये उपलब्ध असेल. मात्र, स्काय ब्लू रंगाचा फोन फक्त Samsung.com वर उपलब्ध आहे.

वाचाः ६ फेब्रुवारीला भारतात येतोय पोकोचा नवा स्मार्टफोन, पॉवरफुल फोनची किंमत किती?

लक्षणीय बाब म्हणजे Galaxy S23 Ultra चे प्री-बुकिंग करणारे ग्राहक Galaxy Watch4 LTE Classic आणि Galaxy Buds2 4,999 रुपयांच्या विशेष किमतीत मिळवू शकतात. तर, Galaxy S23+ चे प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ४,९९९ रुपयांच्या विशेष किमतीत Galaxy Watch4 BT घेण्याची संधी असेल. दरम्यान, व्हॅनिला गॅलेक्सी S23 मॉडेलची प्री-बुकिंग करणाऱ्या खरेदीदारांना ५,००० रुपयांची स्टोरेज अपग्रेड ऑफर मिळू शकते. याशिवाय सर्व ग्राहक ऑनलाईन चॅनेलवर ८,००० रुपयांच्या बँक कॅशबॅकचा देखील लाभ घेऊ शकतात. ज्या ग्राहकांनी २ फेब्रुवारी रोजी Samsung Live दरम्यान Galaxy S23ची सीरिज प्री-बुक केली आहे, त्यांना वायरलेस चार्जर आणि ट्रॅव्हल अडॅप्टरची अतिरिक्त भेट म्हणून मिळेल.

वाचाः Samsung Galaxy S23 सीरीज लाँच, दीड लाखाचा स्मार्टफोन iPhone 14 ला टक्कर देणार?

Samsung Galaxy S23 ची वैशिष्ट्ये
Samsung Galaxy S23 हा स्मार्टफोन भारतात ८२,८६३ रूपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये 50 MP + 12 MP + 10 MP कॅमेराची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जनरेशन ८ प्रोसेसर आहे, ज्यामध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजची सुविधा आहे. तसेच फोनमध्ये ६.८ इंच डिस्पे देण्यात आला आहे. ग्राहकांना नवनवीन सुविधा देणाऱ्या फोनला जीवदान देण्यासाठी 3900 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

वाचाः WhatsApp वर डिलीट झालेला मेसेज वाचण्याची सोपी ट्रिक, पाहा

सर्व स्पेसिफिकेशन्स पाहा

Source link

Samsung Galaxy S23Samsung Galaxy S23 seriessamsung galaxy s23 series camerasamsung galaxy s23 series featuresSamsung Galaxy S23 Ultraसॅमसंग सीरीज
Comments (0)
Add Comment