SSC Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे कधी मिळणार? जाणून घ्या महत्वाची अपडेट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे (हॉलतिकीट) विद्यार्थ्यांना सोमवार (दि. ६)पासून उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थी आणि शाळांना मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी तीन वाजेपासून प्रवेशपत्रे मिळविता येणार आहेत. ऑनलाइन उपलब्ध असणारी प्रवेशपत्रे शाळांनीच विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित आहे. प्रवेशपत्राच्या प्रतीवर अपेक्षित स्वाक्षरी व्यवस्थित आहे की नाही, इथपासून विद्यार्थ्यांकडून शुल्क न आकारण्याच्या सूचनाही शाळांना करण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही मंडळातर्फे करण्यात आले आहे. दि. २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे. त्यासाठीच्या प्रवेशपत्रांत माध्यमानुसार महत्त्वाचे बदल असतील किंवा काही चुका सुधारणे अपेक्षित असेल, तर दुरुस्तीसाठी शाळांनी विभागीय मंडळांशी संपर्क साधावा. शाळांनी विद्यार्थ्यांचे छायाचित्र, नाव, जन्मतारीख आदी दुरुस्त्या करून त्याची प्रत तातडीने विभागीय मंडळाकडे पाठवावी, अशा सूचनाही शाळांना देण्यात आल्या आहेत.

RTE: ‘आरटीई’साठी केवळ ५० शाळांची नोंदणी
-विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळांनी आणखी एक प्रत देणे अपेक्षित असेल. मात्र, त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा असावा.

-प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील, तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत.

-छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचे योग्य छायाचित्र लावून संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी

विद्यार्थ्यांनो, परीक्षेला वेळेत जा!

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी वेळेतच परीक्षा केंद्रावर हजर राहावे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येईल, अशी ताकीदच शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत दहा मिनिटांनी उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा कक्षात प्रवेश दिला जात होता. परंतु, आता विद्यार्थ्यांना ही मुभादेखील राहणार नाही.

SSC HSC Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, परीक्षेत कॉपी केल्यास मिळेल ‘ही’ शिक्षा
खासगी शाळांना NOCचा जाच, दर तीन वर्षांनी नूतनीकरणाची अट

Source link

hall ticketMaharashtra newsSSC Admit CardSSC Board WebsiteSSC ExamSSC Exam 2023SSC Exam Detailsदहावीदहावी परीक्षादहावी प्रवेशपत्रबारावीमहाराष्ट्र बोर्ड
Comments (0)
Add Comment