​पुण्यातील भीषण अपघातात आई-मुलाचा करुण अंत; महिलेचं सरपंच होण्याचं स्वप्नही अधुरं

पुणे : बेल्हा-जेजुरी मार्गावर धामारी परिसरात शुक्रवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात मायलेकासह अन्य एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. संकेत दिलीप डोके आणि विजया दिलीप डोके असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आई आणि मुलाचं नाव आहे. तर ओंकार चंद्रकांत सुक्रे (वय २०) या तरुणानेही आपले प्राण गमावले आहेत.

विजया दिलीप डोके या आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या होत्या आणि त्या लवकरच सरपंचदेखील होणार होत्या. या ग्रामपंचातीचे सरपंचपद महिलेसाठी राखीव असल्याने विजया डोके या सरपंचपदावर विराजमान होणार होत्या. मात्र एका अपघाताने होत्याचं नव्हतं झालं. मुलगा आणि आईने एकाच वेळी जगाचा निरोप घेतला. या अपघाताने डोके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नोकरीचं आमिष दाखवत ढाब्यावर नेलं, पुण्यात तरुणीवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

संकेत डोके आणि ओंकार सुक्रे हे दोघेही लहानपणापासून जीवलग मित्र होते. पूजेच्या कार्यक्रमासाठी सर्वजण सोबत चालले होते. तरुण मुलांच्या अपघाती मृत्यूने मित्र परिवार शोकसागरात बुडाला असून जग बघायच्या आतच दोन तरुणांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

धामारी येथील खंडोबा मंदिराच्या जवळील वळणावर शिक्रापूरच्या बाजूने आलेल्या एम. एच. १४ जी. यू. ६८८० या टेम्पोची डोके यांच्या दुचाकीला धडक बसली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीवरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

Source link

mother and son deathPune Accident Newspune news updatesआई-मुलाचा मृत्यूपुणे अपघातपुणे ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment