व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट Centralbankofindia.co.in या वर जाऊन अर्ज करू शकतात.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती अंतर्गत एकूण २५० पदे भरली जाणार असून मुख्य व्यवस्थापकची ५० पदे तर वरिष्ठ व्यवस्थापकची २०० पदे भरली जाणार आहेत. यासाठी २७ जानेवारीपासून ऑनलाइन अर्जास सुरुवात झाली आहे.
या पदांसाठी इच्छुक असलेले उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराला पुरेसा अनुभव असणे देखील आवश्यक आहे. ज्याचा तपशील नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे.
व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ८५० रुपये भरावे लागतील. तर एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे. याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून ११ फेब्रुवारी २०२३ ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.