Airtel युजर्सची मजा ! नेटफ्लिक्स, प्राइम आणि हॉटस्टार एकाच रिचार्जमध्ये

नवी दिल्ली: Airtel Users: एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरकडे सध्या ग्राहकांसाठी एकूण पाच प्लान्स आहेत. कंपनीने आपल्या ब्रॉडबँड प्लाननमध्ये काही वर्षांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. प्लान्स योग्य किमतीतही येतात. बेस प्लान्स ४९९ रुपयांपासून सुरू होतो आणि सर्वात महागडा प्लान १ Gbps स्पीडसह येतो. एअरटेलकडे अनेक ब्रॉडबँड प्लॅन आहेत, जे ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय OTT फायदे देतात.

वाचा : OnePlus चे युजर्सना गिफ्ट, कमी केली इअरबड्सची किंमत, फीचर्स A1

४९९ रुपयांचा प्लान :

४९९ रुपयांचा प्लान हा कंपनीचा सर्वात स्वस्त प्लान आहे, तो ४० एमबीपीएस स्पीडसह येतो. प्लान अमर्यादित डेटासह येतो, जे प्रत्यक्षात ३.३ TB जलद डेटा आहे. यात मोफत फिक्स्ड-लाइन व्हॉईस कॉलिंग कनेक्शन देखील समाविष्ट आहे. लँडलाईन कनेक्शनसाठीचे साधन ग्राहकाला स्वतः खरेदी करावे लागेल. या प्लानमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये X stream Premium, Apollo 24|7 Circle, Fastag आणि Wynk Music यांचा समावेश आहे.

वाचा: WhatsApp चॅट्स आणि ग्रुप्समध्ये महत्त्वाचे मेसेज पिन करता येणार

७९९ रुपयांचा प्लान:

हा प्लान १०० Mbps स्पीड आणि ३.३ TB मासिक डेटासह येतो. प्लानमध्ये मोफत फिक्स्ड-लाइन व्हॉईस कॉलिंग कनेक्शन देखील उपलब्ध आहे.७९९ रुपयांच्या प्लानमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Xstream Premium, Apollo 24|7 Circle, FASTag आणि Wynk Music यांचा समावेश आहे.

९९९ रुपयांचा प्लान:

हा प्लान २०० Mbps पर्यंतचा वेग आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह येतो. यामध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Disney+ Hotstar, Amazon Prime, Xtreme Premium, VIP सेवा, Apollo 24|7 Circle, Fastag आणि Wynk Premium यांचा समावेश आहे.

१४९८ रुपयांचा प्लान:

प्लान ३०० Mbps पर्यंत स्पीड आणि 3.3TB डेटासह येतो. यामध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Netflix बेसिक सबस्क्रिप्शन, Amazon Prime, Disney+ Hotstar, VIP सेवा, Apollo 24|7 Circle, Fastag आणि Wynk Premium यांचा समावेश आहे.

३९९९ रुपयांचा प्लान:

यामध्ये १ Gbps पर्यंत स्पीड आणि ३,.३ TB मासिक डेटा उपलब्ध आहे. १४९८ आणि ३९९९ रुपयांच्या प्लानसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंगमध्ये फिक्स्ड-लाइन व्हॉइस कॉलिंग कनेक्शन देखील समाविष्ट आहे. नेटफ्लिक्स प्रीमियम, डिस्ने+ हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम, व्हीआयपी सर्व्हिस, अपोलो 24|7 सर्कल, विंक प्रीमियम आणि एक्सस्ट्रीम प्रीमियम यांचा या प्लॅनसह ऑफर केलेल्या अतिरिक्त फायद्यांचा समावेश आहे.

वाचा: ४०० रुपयांपेक्षा कमी किमतीचे जबरदस्त प्लान्स, रोज 2GB डेटासह ‘हे’ फायदे

Source link

airtel plansairtel usersamazon prime plansdisney plus hotstarott plans
Comments (0)
Add Comment