OnePlus Pad चे संभावित फीचर्स
वनप्लसच्या या पॅड मध्ये तुम्हाला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ चिपसेट, १२.४ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकतो. बॅटरी मध्ये 45W फास्ट चार्जिंग सोबत 10090mAh ची बॅटरी मिळू शकते. यात मागील बाजुस ५ एमपी लेन्स सोबत १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. यासोबत यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जावू शकतो.
वाचाः Airtel ने लाँच केले दोन स्वस्त प्लान, ६० जीबी पर्यंत मिळतोय डेटा, अनलिमिटेड कॉलिंग
OnePlus TV 65 Q2 Pro चे संभावित फीचर्स
वनप्लसच्या या स्मार्ट टीव्हीत 120Hz रिफ्रेश रेट सोबत 4K रेजोल्यूशनची 65 इंचाची QLED स्क्रीन दिली जावू शकते. या स्मार्ट टीव्हीत तुम्हाला ३२ जीबी ऑन बोर्ड स्टोरेज सोबत ३ जीबी रॅम, शानदार साउंड क्वॉलिटीसाठी डॉल्बी एटमॉस 70W स्पीकर आणि शानदार व्ह्यूइंग एक्सपीरियन्स मिळू शकतो.
वाचाः फोनवर फक्त एक मेसेज पाठवून लोकांच्या अकाउंटमधून काढले जाताहेत पैसे, या चुका टाळा
OnePlus Buds Pro 2 चे संभावित फीचर्स
वनप्लसच्या बड्स प्रो 2 मध्ये जबरदस्त साउंड क्वॉलिटीसाठी गुगलचे सिग्नेचर स्पेशल ऑडियो फीचर सोबत येवू शकते. यात तुम्हाला ३डी साउंड क्वॉलिटी मिळू शकते. फोनमध्ये अँड्रॉयड फास्ट पेयर ने वेगवान कनेक्टिविटी आणि प्रीमियम डिझाइन दिली जावू शकते.
वाचाः ९ फेब्रुवारीला लाँच होतोय Realme GT Neo 5, पाहा संभावित फीचर्स
OnePlus 11R 5G चे संभावित फीचर्स
OnePlus 11R 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 + Gen 1 प्रोसेसर मिळू शकतो. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सोबत ६.७ इंचाचा AMOLED फुलएचडी + स्क्रीन, ५० मेगापिक्सलचा मेन सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर सोबत ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जावू शकतो.
वाचाः Samsung Galaxy S23 सीरीज लाँच, दीड लाखाचा स्मार्टफोन iPhone 14 ला टक्कर देणार?
OnePlus 11 5G चे संभावित फीचर्स
OnePlus 11 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 8 झेन 2 चिप दिली जावू शकते. या फोनमध्ये QHD+ रिझॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सोबत AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. या सोबत 100W फास्ट चार्जिंग सोबत 5,000mAh ची बॅटरी आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जावू शकतो. फोनला टायटन ब्लॅक आणि इटरनल ग्रीन अशा दोन रंगात आणले जावू शकते.
वाचाः ६ फेब्रुवारीला भारतात येतोय पोकोचा नवा स्मार्टफोन, पॉवरफुल फोनची किंमत किती?