सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या लग्नसोहळ्यासाठी त्यांचे चाहते कमालीचे उत्सुक आहेत. या दोघांबद्दल, त्यांच्या कुटुंबात कोणकोण सदस्य आहेत, याबद्दल त्यांना कुतुहल देखील आहे. कियारा आडवाणी हिच्या कुटुंबाबद्दल जाणून घेऊ या.
कियाराची आई जेनेवीव आडवाणी
कियाराची आई जेनेवीव आडवाणी या पेशानं शिक्षिका आहेत. कियाराच्या आईचे वडील लखनौमधील मुस्लिम कुटुंबातील होते तर त्यांची आई स्कॉटिश ख्रिश्चन होती. कियारानं सोशल मीडियावर तिच्या आईबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जगदीप आडवाणी
कियाराचे वडील जगदीप आडवाणी हे सिंधी असून ते नावाजलेले उद्योगपती आहेत. कियारानं वडिलांबरोबरचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
कियाराचा भाऊ मिशाल आडवाणी
कियारानं तिच्या भावबरोबरचे फारसे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत. परंतु त्या दोघांमध्ये खूप छान बाँडिंग आहे.
मिशाल हा संगीतकार आहे. १३ वर्षांपासून त्यानं संगीत द्यायला सुरुवात केली. तर पेशानं मिशाल सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. मिशालनं लॉस एंजिल्समध्ये अमेरिकी हिप बॉप लीजेंड ए एपी रॉकी याच्याबरोबर काम केलं आहे.
इशिता आडवाणी
कियारा आडवाणी हिला बहिण देखील असून तिचं नाव इशिता असं आहे. इशिता ही वकील असून तिनं कर्म विवान याच्याशी लग्न केलं आहे.
आता सिद्धार्थ मल्होत्रा याच्या कुटुंबात कोणकोण आहे हे जाणून घेऊया. सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते.
रिमा मल्होत्रा
सिद्धार्थची आई रिमा मल्होत्रा. रिमा या गृहिणी आहेत. सिद्धार्थचं आणि त्याच्या आईचं खूप छान बाँडिंग आहे.
हर्षद मल्होत्रा
सिद्धार्थला एक मोठा भाऊ आहे. त्याचं नाव हर्षद. हर्षद हा बँकर म्हणून काम करतो. हर्षद याच्या बायकोचं नाव पूर्णिमा मल्होत्रा असून त्यांना अधिराज हा मुलगा आहे.