अंगाचा थरकाप उडाला… दुचाकी थेट शिवशाहीच्या चाकाखाली, बाईकवर होती दाम्पत्यासह दोन मुलं

जळगाव : जळगावमधील एरंडोल बस स्थानकासमोर दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकी थेट शिवशाही बसच्या समोरच्या चाकाखाली गेली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात दैव बलवत्तर म्हणून दुचाकीवरील दांपत्यास त्यांची दोन्ही मुले कुटुंबीय बचावले. अपघातात दुचाकीवरील सहा वर्षीय बालिका जखमी झाली. हे दांपत्य आपल्या दोन मुलांसह एरंडोल मार्गे साक्री येथून आसोदा भादली येथे शेंडीच्या कार्यक्रमासाठी जात होते.

एरंडोल मार्गे राकेश हरी बच्छाव (वय ३६ वर्षे) हे त्यांची पत्नी योगिता बच्छाव , मुलगा कार्तिक (वय ६ वर्षे) , मुलगी भाग्यश्री (वय ९ वर्षे) असे चारही जण दुचाकीने साक्री येथून निघून असोदा भादली येथे शेंड्यांच्या कार्यक्रमाला जात होते. तर धुळे बस आगाराची शिवशाही बस ही धुळ्याकडून येऊन एरंडोल बस स्थानकाकडे वळतांना दुचाकी व शिवशाही बसचा शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अपघात झाला.

क्लिक करा आणि वाचा- पुण्यातील पेठेतील संतापजनक प्रकार! बळजबरीने केला विवाह, शरीरसंबंधाचा बनवला व्हिडिओ आणि धमकी देत…

अंगाचा उडाला थरकाप

हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात दुचाकी थेट बसच्या समोरच्या चाकाखाली आली. हा अपघात पाहणाऱ्या लोकांच्या क्षणभरासाठी अंगाचा थरकाम उडाला आणि काळजाचा ठोका चुकला. या अपघातात बच्छाव यांची ९ वर्षांची मुलगी भाग्यश्री ही जखमी झाली. भाग्यश्री हिच्यावर एरंडोल येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- फरार नाना पाटेकरला तामिळनाडूतून अटक, फटाका कारखाना स्फोटातील आहे मुख्य आरोपी, पोलिसांना मिळाली टिप

दिशादर्शक फलकाची आवश्यकता

बस स्थानक प्रवेशद्वारासमोर भराव पुलाचे काम सुरू असून या परिसरात दिशादर्शक फलक न लावल्यामुळे बेशिस्त रहदारी बोकाळली आहे. यामुळेच हा अपघात घडला असावा असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे.

क्लिक करा आणि वाचा- पतीचे अनेक स्त्रियांशी अनैतिक संबंध, पत्नी कंटाळली, शेवटी पतीचा असा काढला कायमचा काटा

Source link

an accidentjalgaon newssevere accidentTwo children savedभीषण अपघातशिवशाही बस आणि बाइकचा अपघात
Comments (0)
Add Comment