फरार नाना पाटेकरला तामिळनाडूतून अटक, फटाका कारखाना स्फोटातील आहे मुख्य आरोपी

सोलापूर: नववर्षाच्या स्वागताला १ जानेवारी ०३ रोजी शिराळे पांगरी (ता. बार्शी जि. सोलापूर) येथील फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला होता. फटाक्यांच्या स्फोटात एकुण ५ महिला मृत्युमुखी पडल्या होत्या, तर तीन महिला जखमी झालेल्या आहेत. त्यांवर उपचार सुरू आहेत. याबाबत पांगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयात आजतागायत तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तीनही संशयित आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुख्य संशयित आरोपी नाना शिवाजी पाटेकर (रा. गणेष नगर, उस्मानाबाद) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. गुन्हा घडल्यापासुन तो आपले अस्तित्व लपवून तामिळनाडू राज्यात विविध जिल्ह्यात राहत होता. बार्शी पोलिसांनी नाना पाटेकरच्या तामिळनाडू राज्यात जाऊन मुसक्या आवळल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा- पतीचे अनेक स्त्रियांशी अनैतिक संबंध, पत्नी कंटाळली, शेवटी पतीचा असा काढला कायमचा काटा

तामिळनाडूतील शिवकाशी मधून नाना पाटेकरला अटक

सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी नाना पाटेकर याचा गोपनीय बातमीदार व तांत्रिक पुराव्या मार्फत तपास केला. पोलिसांना असे निदर्षनास आले की, संशयीत आरोपी हा महाराष्ट्र राज्यातुन तामिळनाडु येथे पळुन गेला आहे. सोलापूर पोलिसांच्या पथकाने तामिळनाडु राज्यात जावुन कोईम्बतुर, मदुराई, शिवकाशी या जिल्हयातील माहिती मिळवली. संशयीत आरोपी नाना पाटेकर याचा ठाव ठिकाणा प्राप्त केला. मिळालेल्या माहिती नुसार गुन्हे शाखेच्या पथकाने शिवकाशी (तामिळनाडू) येथे सापळा रचुन संशयीत आरोपी नाना पाटेकर यास ताब्यात घेतले. या गुन्हयाचा तपास उपअधीक्षक जालिंदर नालकूल हे करीत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! शिक्षक आणि विद्यार्थिनीचे जुळले प्रेम, संयम सुटला आणि दोघे क्लासरूममध्ये नको ते करताना पकडले गेले

नाना पाटेकरला चार दिवसांची पोलीस कोठडी

नाना शिवाजी पाटेकर यास दिनांक ४ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला बार्शीतील न्यायालया समोर हजर केले असता, न्यायालयाने संशयित आरोपी नाना पाटेकरला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. नाना पाटेकरला ताब्यात घेण्यासाठी पोलीस निरीक्षक सुहास जगताप, एपीआय धनंजय पोरे, श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान, हरिदास पांढरे, समर्थ गाजरे, दिलीप थोरात, व मोरे, यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

क्लिक करा आणि वाचा- अकोल्यात खळबळ! नोकरीच्या आमिषाने तरुणांची लाखोंची फसवणूक, दिलं जातं बनावट नियुक्तीपत्र, मोठं रॅकेट सक्रिय?

Source link

Nana Patekar arrestedsolapur newsनाना पाटेकर याला अटकबार्शी फटाका कारखाना स्फोटसोलापूर
Comments (0)
Add Comment