घराचं दार उघडून आत प्रवेश, रोख रक्कम चोरली, तेवढ्यात वृद्धाने पाहिलं अन् मग…

रत्नागिरी: दापोली तालुक्यात दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोळथरे ब्राम्हणवाडी येथे एका ७१ वृद्धाला मारहाण करून घरात जबरदस्तीने चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी कोळथरे ब्राम्हणवाडी येथे राहणारे रघुनाथ परशुराम गोमरकर (वय ७१ वर्षे व्यवसाय शेती) यांनी दाभोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

यावरून गावातीलच कोळथरे गुरववाडी येथील संशयित आरोपी निशांत राजेंद्र गुरव (वय २३) याच्यावर भादवि कलम ३९४, ४५७, ३८० प्रमाणे चोरी आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेने कोळथरे परिसरात खळबळ उडाली आहे. दापोली न्यायालयाने संशयित आरोपी निशांत गुरव याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

७१ वर्षीय असलेले रघुनाथ परशुराम गोमरकर हे दिनांक ०२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०७.३० ते रात्री ०९.३० वाजताच्या सुमारास त्यांचे कोळथरे गावातील शेजारी गप्पा मारण्याकरीता राहते घरास कुलुपबंद करुन गेले होते. यावेळी कोळथरे गावात राहणारा संशयित आरोपी निशांत राजेंद्र गुरव रा. गुरवाडी कोळथरे याने फिर्यादी गोमरकर यांच्या राहते घराची कौल काढून घराचे पोटमाळ्यावरुनच घरातील खोलीमध्ये प्रवेश करुन लाकडी कपाटातील रक्कम पाच हजार रोख रक्कमेची चोरी करुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता.

पोटमाळ्यावर कोणीतरी असल्याचा फिर्यादी गोमरकर यांना संशय आल्याने त्यांनी संशयित आरोपीला विचारणा केली असताना आरोपी याने फिर्यादीस मारहाण करून दुखापत केली आणि जबरदस्तीने चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी अटक केलेला गुरव हा तरुण कोळथरे येथील कोळेश्वर देवळाचा पुजारी होता. गोमरकर हे घरात एकटेच असल्याचा गैरफायदा घेऊन हा चोरीचा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

गोमरकर यांचा मुलगा, मुलगी हे सगळं कुटुंब पुणे येथे असतं. या सगळ्या प्रकारचा अधिक तपास दाभोळ करत आहेत. घटनास्थळी दाभोळ पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ, सागर कांबळे, रुपाली यादव आदींनी भेट दिली आणि या संशयित आरोपीला तात्काळ दाभोळ पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे, प्रकरणी अधिक तपास दाभोळ पोलीस करत आहेत.

Source link

23 year old youth thiefRatnagiri newsrobbery in dapolithiefthief beat old manचोररत्नागिरी क्राईमरत्नागिरी न्यूजवृद्धाला मारहाण
Comments (0)
Add Comment