पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटा येथील शांताबाई दत्तराव शेळके व इतर दोन महिला विविध कार्यक्रमात पोळ्या लाटण्याचे काम करतात. यातून मिळणाऱ्या मजुरीतून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. सेनगाव तालुक्यातील हनकदरी येथील नागोराव सुखदेव शिरामे यांच्यासोबत शांताबाई यांची ओळख झाली होती.
दरम्यान, मागील आठ दिवसांपासून नागोराव याने त्यांना सिध्देश्वर येथे एका कार्यक्रमात पोळ्या लाटण्यासाठी जायचे असल्याचे सांगितले. त्यासाठी इतर दोन महिलांनाही सोबत घेण्याचे त्याने सांगितले. त्यावरून शनिवारी सकाळी चार वाजण्याच्या सुमारास नागोराव हा कार घेऊन घोटा येथे आले. त्याने शांताबाई व इतर दोन महिलांना सोबत घेतले. सिध्देश्वर येथे जात असल्याचे सांगत त्याने लिंबाळा मक्ता मार्गे सिध्देश्वर कडे नेले. त्या ठिकाणी आडरानामध्ये त्याने तीनही महिलांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील १.३४ लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने ताब्यात घेतले. सदर प्रकार कोणाला सांगितल्यास शांताबाई यांच्या मुलास मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना लिंबाळामक्ता येथे आणून सोडले.
वाचाः फुकटात साड्या मिळवण्यासाठी महिलांची धावपळ; चेंगराचेंगरीत चार जणींनी जीव गमावला
याप्रकारामुळे तिघी महिला घाबरून गेल्या. त्यानंतर मिळेल त्या वाहने त्या गावात आल्या व घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. तसेच रात्री नर्सी नामदेव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी नागोराव सुखदेव शिरामे (रा. हनकदरी, ता. सेनगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण नागरे, जमादार हेमंत दराडे, डवळे, पी. एस. पाचपुते यांच्या पथकाने आज पहाटे नागोराव यास अटक केली आहे. त्याच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
वाचाः Pervez Musharraf Passed Away: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन