स्वप्नीलची मुलं त्यांच्या आईसोबत बाहेर फिरायला गेली असताना आपल्या वडिलांचा फोटो पाहून जोरजोरात ओरडू लागली. त्यांनी त्याच्या पोस्टरशेजारी उभं राहून फोटोही काढला. हा फोटो स्वप्नीलने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याने पोस्ट करत लिहिलं, ‘असं खूप वेळा नाही घडत ज्यामुळे मला खास असल्याचं फील येईल. स्वतःला एकटं सोडून द्यायचं आणि आपण स्टार असल्यासारखं वाटून घ्यायचं. हे सगळं प्रेक्षकांचं प्रेम आहे. पण मी फक्त या कलेचा एक नोकर आहे आणि कायम राहीन. पण जेव्हा तुमची मुलं त्यांच्या वयाच्या मुलांसोबत बाहेर फिरायला जातात तेही वेगळ्या शहरात. त्यांना तुमचे फोटो संपूर्ण शहरात लागलेले दिसतात. अनेक बिलबोर्डस, होर्डिंग्स, साइनपोस्ट, बसवर आणि ते जोरजोरात ओरडतात बाबी बाबी बाबी (ते मला बाबी म्हणतात ) तेव्हा मला खरंच सुपरस्टार असल्यासारखं वाटतं.’
त्याने पुढे लिहिलं, ‘खूप खूप थँक यू लीना हा फोटो माझ्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. तुमच्या आईवडिलांना तुमचा अभिमान वाटेल असं वागणं ही अविश्वसनीय गोष्ट आहे पण तुमच्या छोट्या मुलांना अभिमान वाटेल असं काही करणं… मला स्टार असल्यासारखं वाटतंय.’ स्वप्नीलच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत तू आमच्यासाठी सुपरस्टार आहेस असं म्हटलं आहे.