पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे वास्तव्यास असलेल्या एका परप्रांतीय महिलेने शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास १५ दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा बनाव करत आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मात्र, तक्रार नोंदवताना पोलिसांना महिलेने सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानुसार पोलिसांनी तपासही सुरू केला. मात्र, पोलिसांना काही सुगावा लागेना. त्यानंतर महिलेच्या सांगण्यावर आणि तिच्या वागण्याचा पोलिसांना संशय वाटू लागला.
पुण्यातील निवडणुकांचं चित्र पालटणार? राज ठाकरेंची मोक्याची क्षणी महत्त्वाची भूमिका, म्हणाले…
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलीसी खाक्या दाखवताच संबधित महिलेने आपणच आपल्या पोटच्या बाळाला पिंपळगाव जोगा कालव्यात फेकल्याची कबुली दिली.
दरम्यान, पोलिसांकडून या महिलेची कसून चौकशी केली जात असून, पोटच्या बाळाला पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात टाकलेल्या बाळाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. या महिलेने केलेल्या कृत्यामागे नेमके काय कारण आहे? याची माहिती समोर आली नसली तरी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. या घटनेने आळेफाटा परिसरात एकच खळबळ उडाली होती. कालव्याला पाणी सुरू असताना ते अर्भक पाण्यात फेकले होते. महिलेने कबुली दिल्यानंतर कालव्याचे पाणी कमी करून ते शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून युद्ध पातळीवर केला जास आहे.
लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज ब्लॉक; ‘या’ फेऱ्या रद्द तर काही गाड्या १५ मिनिटे विलंबाने धावणार