सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवर अखेर मामा बाळासाहेब थोरातांनी मौन सोडले, म्हणाले जे राजकारण…

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक निकाल जाहीर झाले आणि यात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला. यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू झाले. सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस गंभीर आरोप करत टीका केली. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे आता काय भूमिका मांडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. बाळासाहेब थोरात यांनी अखेर आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे निमित्त साधत सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीप्रकरणी आपलं मत व्यक्त केलं आहे. आपण आजारी असल्यामुळे राजकारणापासून काहीकाळ दूर होतो, असे सांगत त्यांनी आपली भूमिका मांडली.

बाळासाहेब थोरात याच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर येथे शिंदेशाही बाणा हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी आजारी असल्याने थोरात यांनी ऑनलाइन उपस्थिती दाखवत कार्यकर्त्यांना संबोधित केलं. ते म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत खूप राजकारण झालं. सत्यजित खूप चांगल्या मताने विजय झाला, त्याचे अभिनंदन. जे राजकारण झालं ते मला व्यथित करणारं आहे. मी माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे आणि म्हणून ते बाहेर बोलू नये अशा मताचा मी आहे. या बाबतीत राज्य पातळीवर पक्ष पातळीवर आम्ही योग्य निर्णय करू, असेही ते पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य, म्हणाले जात ही देवाने नाही तर पंडितांनी निर्माण केली

काही लोक गैरसमज पसरविण्याचे काम करत आहेत- थोरात

काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. मधल्या काळात अशा बातम्या आल्या की आपल्याला पार भारतीय जनता पक्षापर्यंत नेऊन पोहचवलं होतं. एवढंच नाही तर भाजपच्या तिकिटाचे वाटप देखील करून टाकलं. काही लोक गैरसमज पसरवण्याचे काम करताय. त्यांनी अनेक प्रकारच्या चर्चा घडवून आणल्या.
आतापर्यंत काँग्रेसच्या विचाराने वाटचाल केली. पुढील वाटचाल त्याच विचाराने राहाणार याची ग्वाही देतोय, असे सांगत त्यांनी गैरसमज पसरवणाऱ्या नेत्यांना भूमिकेवर बोट ठेवले.

क्लिक करा आणि वाचा- बीआरएस पक्षाची राज्याच्या राजकारणात एंट्री, दोन माजी आमदारांचा प्रवेश, राव यांनी मोदींना ललकारले

या संघर्षातूनही आपण बाहेर येऊ- बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात उपस्थितांना भावनिक साद घालत पुढे म्हणाले की, ‘सत्ता बदलानंतर संगमनेर तालुक्यावर सूड उगवल्यासारखे हल्ले होत आहेत. अनेक कार्यकर्त्यांना त्रास देऊन अडचणीत आणलं जातंय. त्यांचे उद्योग व्यवसाय बंद पाडण्यासाठी नाही त्या प्रकारचे प्रयत्न केले जाताय. विकासाची कामे बंद पाडण्याचा प्रयत्न. सत्तेमध्ये आपणही राहिलो आहे मात्र दुर्दैवाने आपण हा अनुभव घेत आहोत. मात्र संगमनेर तालुक्याने कायम संघर्ष केला असून त्यातूनच आपण मोठे झाले आहोत. या संघर्षातूनही आपण बाहेर येऊ आणि नव्या उमेदीने उभं राहू याची मला खात्री आहे.’

क्लिक करा आणि वाचा- मन सुन्न करणारी घटना! १० वर्षांपूर्वी वडिलांना संपवले, आता आईलाचाही घेतला जीव, पेंशनसाठी मुलगा बनला हैवान

तांबे मला भेटायला येणार आहेत- देवेंद्र फडणवीस

दरम्यान, सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केले आहे. तांबे हे अपक्ष अपक्ष निवडून आले आहेत. लोकल लेवलवर आमचा उमेदवार नसल्याने आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य केलं असेल. आज तरी ते आमच्या पक्षात येणार की नाही हे मी बोलणार नहाी. ते मला भेटायला येणार आहेत तेव्हा आम्ही बोलू, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Source link

Balasaheb ThoratCongresssatyajit tambeउमेदवारीकाँग्रेसबाळासाहेब थोरातसत्यजीत तांबे
Comments (0)
Add Comment