Uddhav Thackeray: महाराष्ट्राचं अनलॉकच्या दिशेने मोठं पाऊल; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले…

हायलाइट्स:

  • राज्य सरकारने अनलॉकच्या दिशेने टाकलं मोठं पाऊल.
  • पहिल्या टप्प्यात मुंबईसह २३ जिल्ह्यांना मोठा दिलासा.
  • निर्बंध शिथील करताना मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा संदेश.

मुंबई: करोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत निर्बंधांच्या बेडीत अडकावे लागल्यानंतर राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय झाला आहे. तिसऱ्या लाटेच्या धसक्याने थंडावलेली अनलॉक प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून करोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या २२ जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात दिलासा मिळाला आहे. या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून निर्बंध बऱ्याच अंशी शिथील करण्यात येत असून या आदेशासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. ( CM Uddhav Thackeray On Maharashtra Unlock )

वाचा:आदेश जारी; राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील

साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ब्रेक द चेन अंतर्गत मुख्य सचिव सीताराम कुटे यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर या ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल ३ चे निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहेत तर मुंबई आणि ठाण्याचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर सोपवून बाकी २२ जिल्ह्यांत निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली. या आदेशानंतर पाठोपाठ मुंबई पालिकेनेही आदेश जारी करत पालिका क्षेत्रात निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याबाबतचं आवाहन केलं आहे.

वाचा:सलून रविवारी ठेवावं लागणार बंद; २२ जिल्ह्यांसाठी अशा आहेत गाइडलाइन्स

‘राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. ब्रेक द चेन अंतर्गत तसा आदेश जारी करण्यात आला आहे. हे आदेश उद्यापासून लागू होणार आहेत. ही सूट देण्यात येत असली तरी नागरिकांनी आरोग्याचे नियम पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरत राहावे’, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे. राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट बऱ्यापैकी नियंत्रणात येत असली तरी करोनाचा धोका टळलेला नाही. काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या अजूनही मोठी आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना कोविड नियम पाळण्यासाठी आग्रह धरला आहे.

दरम्यान, राज्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. राज्यात दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या देशात सर्वाधिक आहे. यामुळेच कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका असला तरी सरकारने सामान्यांची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

वाचा:मुंबईत उद्यापासून रात्री १० पर्यंत दुकाने खुली राहणार; ‘असा’ आहे आदेश

Source link

maharashtra unlock guidelinesmaharashtra unlock guidelines updatesuddhav thackeray on covid restrictionsuddhav thackeray on maharashtra lockdownuddhav thackeray on maharashtra unlockउद्धव ठाकरेकरोनाकोविड नियमकोविड प्रतिबंधक लसीकरणमुंबई
Comments (0)
Add Comment