‘अग्निवीर’ भरतीसाठी आता सामायिक प्रवेश परीक्षा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल केला आहे. यानुसार यापुढे लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना आधी ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागणार आहे. त्यानंतर शारीरिक तंदुरुस्ती (फिजिकल फिटनेस) आणि वैद्यकीय चाचण्या द्याव्या लागतील.

भरती प्रक्रियेतील बदलाबाबत लष्कराकडून विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली आहे. तथापि, यासंदर्भातील अधिसूचना फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत जारी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी शनिवारी सांगितले.

अग्निवीर भरतीसाठी पहिली ऑनलाइन चाचणी एप्रिलमध्ये देशभरात सुमारे २०० ठिकाणी घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीची सर्व तयारीही पूर्ण झाली आहे. नव्या बदलामुळे भरतीदरम्यान होणारी गर्दी कमी होईल आणि भरतीचे व्यवस्थापन व आयोजन सोपे होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

अग्निवीरच्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना प्रथम शारीरिक तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागत होती. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी होत होती व अखेरीस ‘सीईई’ घेतली जात होती. परंतु नव्या बदलानुसार आता आधी ही ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल, असे अनेक प्रमुख वृत्तपत्रांमध्ये देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

२०२३-२४च्या भरतीद्वारे लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या सुमारे ४० हजार उमेदवारांना हा नवा बदल लागू होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

TET: शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी ‘टेट’ २२ फेब्रुवारीपासून

भरतीत गोंधळ

मुंबईत दहिसर येथे सुरू असलेल्या अग्निशमन दलाच्या भरतीमध्ये शनिवारी गोंधळ झाला. वेळेत न आल्याने आणि उंचीमध्ये न बसणाऱ्या महिलांना प्रवेश देण्यास नकार देण्यात आल्याने हजारो महिला उमेदवारांनी भरतीच्या ठिकाणी आंदोलन केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी या उमेदवारांवर सौम्य लाठीमार केला. चर्चेनंतर काही उमेदवारांना प्रवेश देण्यात आला.

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातर्फे विविध पदांसाठी १२ जानेवारीपासून दहिसर येथील भावदेवी मैदानावर भरती प्रक्रिया सुरू आहे. शनिवारी भरतीसाठी अपेक्षेपेक्षा जास्त मुली राज्याच्या कानाकोपऱ्यातून आल्या. यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच भरतीसाठी आलेल्या शेकडो मुलींना उंचीचे व वेळेत न आल्याचे कारण दाखवून मैदानात घेण्यास नकार देण्यात आला. यामुळे संतापलेल्या महिला उमेदवारांनी मैदानाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू केले.

सुमारे दोन हजार महिला उमेदवार प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून जोरजोरात घोषणा देत असल्याने या ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण झाले. भरती प्रक्रिया राबविणाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. तरीही महिला उमेदवार ऐकत नसल्याने पोलिसांनी त्यांना हटविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर पोलिस, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करून यावर तोडगा काढत काही उमेदवारांना प्रवेश दिला.

BSF Job: बारावी उत्तीर्णांना बीएसएफमध्ये नोकरीची संधी, १ लाखाहून अधिक मिळेल पगार
Bank Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

Source link

agniveerAgniveer CETAgniveer JobAgniveer RecruitmentAgniveer VacancyCommon Entrance TestMaharashtra Timesअग्निवीर भरतीसामायिक प्रवेश परीक्षा
Comments (0)
Add Comment