धक्कादायक! पुण्यातून FBवर शेअर केला चाइल्ड पॉर्नोग्राफीचा व्हिडिओ, या शहरापर्यंत पोहोचले कनेक्शन

बीड: लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा व्हिडिओ बीड जिल्ह्यातील नांदुर घाट तालुका केज येथील व्यक्तीने पुण्यातून फेसबुकच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर केला. त्यामुळेच फेसबुकने महाराष्ट्र सायबर क्राईम सेलला दिलेल्या अहवालानंतर बीड सायबर ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला आहे.

चाइल्ड पॉर्नोग्राफी इंटरनेट माहिती संकलनासाठी इंटरनेट सर्विस देणाऱ्या कंपन्यासह यामध्ये काही सॉफ्टवेअरची देखील मदत घेण्यात येते. पॉक्सो कायद्याने चाइल्ड पॉर्नोग्राफी थेट बालकांची किंवा त्यांच्याप्रमाणे दिसणाऱ्या चित्रांचा वापर करून अश्लील व्हिडिओ चित्र फोटो किंवा डिजिटल साहित्य तयार केले जातात ते सर्च व शेअर करणे गुन्हा आहे.

वाचा- Adani LIC News : तोटा? LICचा तर फायदा झालाय; अदानींच्या शेअर्समध्ये १ रुपयाही…

दरम्यान अशाच प्रकारचा व्हिडिओ बीड जिल्ह्यातील नांदूर घाट येथील एकाने फेसबुकच्या माध्यमातून शेअर केल्याचे समोर आले. या प्रकरणी राज्याचे सायबर क्राईम विभागाने बीड पोलीस विभागाला पत्र पाठवून याविषयी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून बीड सायबर सेलला या व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद झाला असून त्या व्यक्तीचा सध्या पोलीस प्रशासन शोध घेत आहेत.

वाचा- माझ्याकडे LIC पॉलिसी आहे, अदानींमुळे माझे पैसे बुडतील का? जाणून घ्या नेमकं सत्य काय

मात्र चाइल्ड पॉर्नोग्राफी हा कायद्याने गंभीर गुन्हा असून हा गुन्हा अजामीन पात्र आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफी संदर्भात व्हिडिओ शेअर करणे व्हिडिओ सर्च करणे किंवा व्हिडिओ पाहणे हा सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा आहे. अशा प्रकारे जर कोणी करत असेल तर त्यावर सायबर सेल हे लक्ष ठेवून आहे. अशा प्रकारे कोणीही कोणतीही गोष्ट करू नये नजर चुकीने जर बाल लैंगिक शोषणाचा एखादा व्हिडिओ सर्च झाला किंवा तो व्हिडिओ शेअर केला तर कायद्यान्वये त्या व्यक्तीवर अजामीन पात्र गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी देखील माहिती सायबर सेल अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Source link

beed newschild pornography shared on fbChild sexual abuse NewsPune newsvideo of child pornographyलैंगिक शोषण
Comments (0)
Add Comment