राजस्थानच्या बिकानेर येथील रहिवासी असलेल्या प्रेमसुख देलू यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. पण कठोर परिश्रमाने ते पहिले पटवारी बनले. मात्र इथेच न थांबता ते यूपीएससी परीक्षेची तयारी करत राहिले आणि आयपीएस अधिकारी झाले.
प्रेमसुख देलू यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्याचे वडील उंटगाडी चालवायचे आणि लोकांचे सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असत. आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढायचे असे प्रेम यांना लहानपणापासूनच वाटायचेय होते. त्यामुळे त्यांचे लक्ष फक्त अभ्यासावर होते.
प्रेमसुख देलू यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांच्याच गावातील सरकारी शाळेतून घेतले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण बिकानेरच्या शासकीय डुंगर महाविद्यालयातून केले. त्यांनी हिस्टरीमध्ये एमए केले आणि सुवर्णपदक जिंकले. यानंतर इतिहास विषय घेऊन यूजीसी नेट आणि जेआरएफ परीक्षा उत्तीर्ण केल्या.
प्रेम सुख देलू यांचा मोठा भाऊ राजस्थान पोलिसात हवालदार आहे आणि त्यांनीच प्रेमला स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रेरित केले. २०१० मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पटवारी भरतीसाठी अर्ज केला आणि त्यात ते यशस्वी झाले. आपल्यात यामध्ये अधिक क्षमता आहे असे त्यांना सतत वाटायचे. पटवारी म्हणून काम करत असताना त्यांनी पदव्युत्तर पदवीही मिळवली आणि नेटही पास केली.