सर्वात आधी आपल्या स्मार्टफोनमध्ये एक वेब ब्राउजर सारखे Google Chrome, Firefox ला ओपन करा नंतर OpenAI च्या वेबसाइटवर जा. डिस्प्ले वर सर्वात वर दिसत असलेल्या Try ChatGPT वर क्लिक करा. जर तुमच्याकडे आधीच OpenAI अकाउंट असेल तर लॉगइन करा. जर नसेल तर फोन नंबर आणि ईमेल सोबत एक नवीन अकाउंट बनवा. याशिवाय, आपल्या स्मार्टफोनच्या वेब ब्राउजवरवर थेट chat.openai.com टाइप करून चॅटजीपीटीचे अॅक्सेस मिळवा. तुम्ही जीमेल किंवा मायक्रोसॉफ्ट अकाउंटचा वापर करून ChatGPT वर अकाउंट बनवू शकता. यानंतर चॅटबॉक्स मध्ये जावून आपला प्रश्न विचारू शकता. हे AI टूल फ्री रिसर्च प्रिव्यू प्रोग्राम अंतर्गत फ्री आहे.
वाचाः Valentine’s Day Sale : iPhone 14 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, पाहा ऑफर
- ChatGPT ला अँड्रॉयड डिव्हाइसवर फ्री वापर केला जावू शकतो?
होय, चॅटजीपीटीला कोणत्याही डिव्हाइसवरून फ्री मध्ये वापरता येवू शकते. यात अँड्रॉयड, टॅबलेट, नोटबुक आणि स्मार्टफोनचा समावेश आहे.
- iPhone साठी ChatGPT फ्री आहे?
होय, आयफोन, आयपॅड, आणि मॅक यूजर्ससाठी चॅटजीपीटीचे फ्री अॅक्सेस मिळू शकते.
- आयफोनसाठी कोणतेही अधिकृत ChatGPT अॅप उपलब्ध आहे?
नाही, आयफोन आणि आयपॅडसाठी कोणतेही अधिकृत ChatGPT अॅप उपलब्ध नाही.
- अँड्रॉयडसाठी कोणतेही ChatGPT अॅप उपलब्ध आहे?
अँड्रॉयड डिव्हाइससाठी अजून पर्यंत कोणतेही अधिकृत ChatGPT अॅप उपलब्ध नाही.
वाचाः Valentine’s Day Sale : iPhone 14 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, पाहा ऑफर