Authored by रोहित दीक्षित | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 6 Feb 2023, 10:00 pm
Maharashtra Crime news | बीडमध्ये वहिनी आणि दीराच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. भाऊजयीवर सख्ख्या आणि मावस दीराकडून बलात्कार. घटनेमुळे गेवराई तालुक्यात खळबळ.
हायलाइट्स:
- आंघोळ करताना व्हिडिओ शूट केला
- मुलीची नवरा आणि सासूकडे तक्रार
- नवऱ्याच्या भावाकडून वारंवार महिलेवर बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपली २४ वर्षीय भाऊजय ही आंघोळ करताना सख्या दीराने अश्लील म्हणजेच तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांनी ही घटना आपल्या नवरा आणि सासूला सांगितल्यानंतर याविषयी त्या दोघांनीही, ‘आमचा मुलगा असा नाही तू आमच्या मुलाला बदनाम करायचा प्रयत्न करत आहेस’, असे म्हणत त्यांनी या प्रकारावर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दीराची हिंमत आणखी वाढली. तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी त्याने पीडितेला दिली. या दबावाला बळी पाडून दीराने वहिनीवर अनेकदा बलात्कार केला. तो एवढ्यावरच थांबला नाही. काही दिवसांनी त्याने आपल्या मावसभावाला बोलावले.
‘हा माझ्यासाठी खूप काही करतो, पैसा देतो गाडी देतो, याच्यासंग तुला ते करावाच लागेल नाहीतर तुझे व्हिडिओ ही सोशल मीडियावर मी व्हायरल करेन’ अशी धमकी दीराने दिली. त्यामुळे संबंधित महिलेला नाईलाजाने मावस दीरासोबतही शरीरसंबंध ठेवावे लागले. अनेक दिवस हा प्रकार सुरु होता. अखेर एक दिवस पीडितेच्या संयमाचा बांध तुटला आणि तिने तडक आपले माहेर गाठले. यानंतर आपल्या आईसोबत गेवराई पोलीस ठाण्यात जाऊन पीडितेने झालेल्या प्रकाराबद्दल तक्रार नोंदवली.
पोलीस प्रशासनाने तात्काळ सख्या दीरासह मावसदिरावर 376 (2) 323,506 नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेने गेवराई तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांनी तिच्या पाठिशी उभे राहणे आवश्यक होते. मात्र, पीडितेचा नवरा आणि सासूने तिचे म्हणणे ऐकून न घेतला तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. नवरा आणि सासूने वेळीच यामध्ये हस्तक्षेप केला असता तर हा अनैतिक प्रकार घडलाच नसता अशी कुजबूज गेवराई तालुक्यात सुरु आहे. सध्या गेवराई पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु असून आता संबंधित आरोपींवर काय कारवाई होणार, हे पाहावे लागेल.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.