IAS Success Story: यूपीएससी परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो लोक या परीक्षेला बसतात. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा परीक्षा आयोजित केली जाते. यात काही मोजकेच लोक यशस्वी होतात कारण या परीक्षेसाठी अनेक वर्षे तयारी करावी लागते. अशा परिस्थितीत यूपीएससीची तयारी करताना नैराश्याचा बळी ठरलेल्या तरुणाची कहाणी आज आम्ही घेऊन आलो आहोत. अशा परिस्थितीत असतनाही त्याने हार मानली नाही. नैराश्यावर मात करत आयएएस बनलेल्या शिशिर गुप्ताची कहाणी जाणून घ्या.
शिशिरचे वडील सरकारी शाळेत प्राचार्य आहेत. राजस्थानमधील जयपूर येथे राहणाऱ्या शिशिर गुप्ताने जयपूरमधूनच शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर तो जेईई मेन उत्तीर्ण झाला आणि त्यानंतर जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा दिली. पुढे त्याने आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घेतला.
शिशिरचे वडील सरकारी शाळेत प्राचार्य आहेत. राजस्थानमधील जयपूर येथे राहणाऱ्या शिशिर गुप्ताने जयपूरमधूनच शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर तो जेईई मेन उत्तीर्ण झाला आणि त्यानंतर जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा दिली. पुढे त्याने आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घेतला.
शिशिरने आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिशिरला मोठ्या पॅकेजसह अबुधाबीमध्ये नोकरी मिळाली. पण आयएएस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्याने नोकरी सोडून आयएएस अधिकारी होण्याची तयारी सुरू केली.
प्रिलिम्सची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास
शिशिर २०१६ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी प्रिलिम्स परीक्षेला बसला आणि त्यात तो यशस्वी झाला होता. मात्र मुख्य परीक्षेपूर्वीच तो आजारी पडला. यामुळेच तो मुख्य परीक्षेत अयशस्वी ठरला. दुसऱ्या प्रयत्नातही शिशिरने सर्व स्तर पार केले, पण शेवटी सहाव्या क्रमांकावरच राहिला. दोनवेळा नापास झाल्यानंतर शिशिर डिप्रेशनमध्ये गेला होता. तथापि त्याने लवकरच नैराश्यातून स्वत:ला सावरले आणि ५० व्या क्रमांकासह आयएएस बनून यश संपादन केले.