वोडाफोन आयडियाचा ९९ रुपयाचा प्लान
वोडाफोन आयडियाचा ९९ रुपयाचा प्री पेड रिचार्ज प्लानमध्ये २०० एमबी डेटा ऑफर केला जातो. या प्लानमध्ये ९९ रुपयाचा टॉकटाइम दिला जात आहे. तर ९९ रुपये खर्च करून यूजर्सला २.५ पैसे प्रति सेकंद या हिशोबाप्रमाणे चार्ज वसूल केला जाईल. यूजर्सला या प्लानमध्ये कोणताही फ्री मेसेजिंग सुविधा मिळत नाही. वोडाफोन आयडियाच्या ९९ रुपयाचा रिचार्ज प्लानला वोडाफोन आयडिया वेबसाइट आणि अॅपवरून रिचार्ज करता येवू शकते.
वाचाः ७ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ३२ इंचाचा टीव्ही, या साइटवरून खरेदी करा
वोडाफोन आयडिया २४९ रुपयाचा प्लान
वोडाफोन आयडियाकडून २४९ रुपयाचा एक प्लान आणला आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटाची सुविधा दिली जात आहे. सोबत या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानची वैधता २१ दिवसाची आहे. याशिवाय, रोज १०० एसएमएस दिले जात आहे. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होवून 64Kbps राहते.
वाचाः ChatGPT संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, कसं वापरायचं, तेही पाहा
Vi ला होतेय नुकसान
वोडाफोन आयडियाला गेल्या काही दिवसांपासून व्यापारात नुकसान सोसावे लागत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या नुकसानातून कंपनी लवकरच बाहेर पडेल. या नुकसानामुळे कंपनीने भारतात ५जी रोलआउट सुरू केले नाही. सोबत ५जी स्पेक्ट्रम लिलावात भाग घेतला नव्हता.
वाचाः Valentine’s Day 2023 : स्वस्तात मिळताहेत शाओमी, रेडमी, ओप्पो आणि सॅमसंगचे स्मार्टफोन्स, पाहा ऑफर्स