मुंबईत भर बाजारात तिच्या ओठांवर फिरवली १०० ची नोट अन् म्हणाला…; रोडरोमिओला अखेर घडली अद्दल

मुंबई : मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष POCSO कायदा न्यायालयाने एका व्यक्तीला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. संबंधित आरोपीने एका अल्पवयीन मुलीच्या ओठांवर १०० रुपयांची नोट फिरवली आणि ‘तू इतना भव क्यों खा रही है?’ असं विचारलं. या घटनेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर कोर्टाने यावर निर्णय देत आरोपीला १ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचीही माहिती आहे. या ३२ वर्षीय आरोपीला शिक्षा सुनावताना, त्याचे कुटुंब हे त्याच्यावर अवलंबून आहे. इतकंच नाहीतर त्याची आई कर्करोगाशी झुंज देत असल्याची बाब लक्षात घेतली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला योग्य ती शिक्षा देण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील वीणा शेलार यांनी आरोपीला दोषी ठरवण्यासाठी दिलेल्या साक्षीदारांमध्ये मुलगी, तिची आई आणि शेजारी यांचा समावेश आहे, अशी माहिती विशेष न्यायाधीश एस.सी. जाधव यांनी दिली.

एका महिलेचा २ पुरूषांसोबत सुरू होता भलताच व्यवसाय; रंगेहात पकडताच पोलिसही चक्रावले
२०१७ मध्ये घडली होती घटना…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०१७ रोजी रात्री पीडित तरुणी बाजारात गेली होती. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करत तिला थांबवले आणि तिला जवळ खेचले. त्याने लगेच त्याच्याकडील १०० रुपयांनी नोट काढली आणि मुलीच्या ओठांवर फिरवली. या प्रकरणात, १४ जुलै २०१७ रोजी आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये त्याला जामीन मिळाल्यानंतर आणखी एका प्रकरणात त्याला अटक झाली.

अल्पवयीन पीडितेने घरी पोहोचल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची तिने आपल्या आईकडे तक्रार केली. तिच्या आईने तातडीने पोलीस स्थानक गाठत यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी वारंवार मुलींचा पाठलाग करायचा. तो शाळेतही शिट्ट्या मारत तिच्यावर कंमेंट्स पास करायचा. आरोपीने पीडितेला आणि तिच्या आईला जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. अखेर न्यायालयाने या प्रकरणात आरोपीला एक वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

आकाशातून जाणाऱ्या रहस्यमय वस्तूचं गूढ उलगडलं; नाशिक, विदर्भासह, नागपूरकरांनी नेमकं काय पाहिलं?

Source link

maharashtra breaking news in marathimaharashtra crime news todaymumbai breaking newsmumbai breaking news in marathimumbai crime news todayमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज़ todayमुंबई क्राइम न्यूज़मुंबई न्यूज़ लाइव todayमुंबई बातम्या मराठीमुंबईच्या ताज्या बातम्या आजच्या
Comments (0)
Add Comment