थाटामाटात पार पडलेल्या विवाहसोहळ्यानंतर हे नवविवाहित दाम्पत्य कोकणात देवदर्शनासाठी पोहोचलं. त्यांनी कोकणातील प्रसिद्ध देवस्थान कुणकेश्वर मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं. या देवदर्शनाचे काही फोटो सुमितने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले असून या फोटोंवरही चाहते अभिनंदनाचा वर्षाव करतायंत. सुमित-वनिताने अंगणेवाडी, कुणकेश्वर याठिकाणचे फोटो सध्या चर्चेत आहे.
हे वाचा-आई लोकप्रिय अभिनेत्री तर लेकींची सोशल मीडियावर हवा, बॉलिवूड डेब्यूसाठी तयार?
दरम्यान कोकणातील देवदर्शनाशिवाय आणखी एका कारणामुळे हे फोटो चर्चेत आले. हे कारण म्हणजे वनिताच्या गळ्यातील मंगळसूत्र. नव्या नवरीच्या श्रृंगाराप्रमाणे वनिताच्या गळ्यातही तीन ठसठशीत मंगळसूत्र दिसून आली. मुहूर्तमणी, छोटं मंगळसूत्र आणि मोठं मंगळसूत्र या वनिताच्या दागिन्यांनी लक्ष वेधून घेतलं. यावेळी ती साडी आणि पंजाबी ड्रेस अशा पारंपरिक अंदाजात दिसली. तर सुमितने ट्रेडिशनल कुर्ता परिधान केला होता.
हे वाचा-पठाणमुळे कार्तिकच्या ‘शहजादा’ला फटका, फ्लॉपच्या भीतीमुळे हे सिनेमाही लांबणीवर!
०२ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले सुमित-वनिता
गेल्यावर्षी जानेवारीमध्ये लग्नाची बोलणी झाल्यानंतर वनिता आणि सुमित यांनी २०२३ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी ०२ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. सुमित-वनिता काही वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. मात्र लॉकडाऊनमध्ये त्यांची मैत्री अधिक दृढ झाली आणि यामागचं कारण होतं ‘लुडो’. लॉकडाऊनमध्ये तासंतास लुडो खेळताना त्यांच्यामध्ये घनिष्ठ मैत्री झाली आणि मग लॉकडाऊननंतर भेटीगाठी वाढल्या. वनिताला रिलेशनशिप-अफेअर यामध्ये गुंतून पडायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनी थेट लग्नाचाच निर्णय घेतला. सुमित-वनिताने एका मुलाखतीमध्ये ही भन्नाट प्रेमकहाणी सांगितली होती.