बेलापूर- गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सीच्या पहिल्या फेरीचे उद्घाटन बंदर विकास मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मंगळवारी झाले. दक्षिण मुंबईतून नवी मुंबईत पोहोचण्यासाठी दोन तासांचा वेळ लागतो. खासगी कॅब केल्यास ५०० ते ६०० रुपये होतात. तसंच, ट्रॅफिक असल्याच प्रवाशांची अजूनच कोंडी होती. पण ही वातानुकूलित वॉटर टॅक्सी सेवा दक्षिण मुंबईला – नवीमुंबई एका तासात जोडणार आहे.
रस्तेमार्गाने बेलापुरला जाण्यासाठी दोन तासांचा अवधी लागतो. मात्र, या नव्या वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून अवघ्या एक तासांत बेलापूर गाठणे शक्य होणार आहे. प्रवाशांसाठी ३५० रुपये इतके तिकिट दर आहेत. एका वॉटर टॅक्सीमध्ये २०० जण प्रवास करु शकतात. वॉटर टॅक्सीच्या लोवर डेकमध्ये प्रवास करण्यासाठी २५० रुपये तिकिटाचा दर आहे तर, अपर डेकमध्ये प्रवास करण्यासाठी ३५० रुपयांचे तिकिट आहे.
वाचाः तुर्कीत भूकंपानंतर हाहा:कार; होत्याचे नव्हते झाले, ७२ तासांत तंतोतत खरी ठरली भविष्यवाणी
गेट वे ऑफ इंडियातून सुरू होणारी ही वॉटर ट्रक्सी देशातील पहिली हायस्पीड बोट आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या मार्गावर एकच फेरी असेल. सकाळी ८.३० वाजता बेलापूरहून वॉटर टॅक्सी रवाना होईल व ९.३० वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचेल. तर, संध्याकाळी ६.० वाजता गेट वे ऑफ इंडिया येथून बोट रवाना होईल व ७.३० वाजता बेलापूर येथे पोहोचणार आहे. सध्या कंपनीचं टार्गेटहे ऑफिसमधील कर्मचारी आहेत. अनेक कर्मचारी रोज बेलापूर ते मुबई असा रोज प्रवास करतात. त्यांच्यासाठी बोटीच्या फेऱ्या ऑफिसच्या वेळेत ठेवल्या आहेत. लोकांचा प्रतिसाद वाढल्यानंतर आणखी फेऱ्या वाढवल्या जातील, असं कंपनीने म्हटलं आहे.
वाचाः मुंबईहून अलिशान वंदे भारत एक्स्प्रेसने शिर्डीला जाताय; इथे पाहा तिकिटाचे दर
फेऱ्यांच्या संभाव्य वेळा
बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया – सकाळी ८.३० वाजता
गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर – सायंकाळी ६.३० वाजता
वाचाः सकाळी आईचे निधन, दुपारी लेकीवर काळाचा घाला; माय-लेकींची अंत्ययात्रा एकत्रच निघाली