यावर्षी जेईई मेन परीक्षेला बसण्यासाठी साधारण ९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एनटीएकडून या विद्यार्थ्यांसाठी मुख्य परीक्षेचा निकाल कधीही जाहीर केला जाऊ शकतो. निकाल तपासण्यासाठी (जेईई मुख्य निकाल) विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. उत्तरतालिका तपासण्याची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे.
JEE Main Result: पुढील स्टेप्स करा फॉलो
स्टेप १- JEE मुख्य निकाल पाहण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
स्टेप २- वेबसाइटच्या होमपेजवरील JEE मेन रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३- लिंकवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
स्टेप ४- लॉगिन केल्यानंतर तुमचे स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल.
स्टेप ५- शेवटी ते तपासा आणि भविष्यातील वापरासाठी हार्ड कॉपी देखील ठेवा.
यावर्षी पहिल्या सत्रासाठी जेईई मेन २०२३ पेपर १ परीक्षेत बसण्यासाठी साधारण ९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांमध्ये २.६ लाखांहून अधिक मुली आणि ६ लाखांहून अधिक मुलांचा समावेश आहे.
एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी ९५.७९% विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगचा पेपर लिहिला तर ०.४६ लाख विद्यार्थ्यांनी पेपर १ मध्ये परीक्षा दिली. जेईई मेन सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसले आहेत.
अंतिम उत्तरतालिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा