ड्रामा क्वीन राखीने सोमवारी सुरुवातीला माहिती दिली की आदिल खानपासून वेगळे होणार आहे. राखीने आदिलवर फसवणूक केल्याचे आरोप केले होते. तिच्या म्हणण्यानुसार आदिल तिचे चार लाख रुपये अन् सोनं घेऊन पळाला. शिवाय त्याचे तनू चंडेलसोबत अफेअर असल्याचा आरोपही केला होता. या आरोपानंतर राखीचा पॅपाराझींशी बोलतानाचा व्हिडिओ समोर आला.
हे वाचा-एका वचनामुळे लतादीदींना मिळालं नव्हतं त्यांचं प्रेम; सुंदर नात्याची अधुरी राहिलेली कहाणी
‘रोजची भांडणं अन् तणावामुळे आदिलने असे ठरवले की तो माझ्यापासून वेगळे होणार असून तो तनूसोबत राहील’, असे राखीने म्हटले. त्याने बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी माझा वापर केला, असा आरोपही राखीने आदिलवर केला. त्यामुळे राखी-आदिल घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले होते. मात्र यानंतर समोर आलेल्या ‘डिनर डेट’च्या व्हिडिओने सर्वांनाच गोंधळात टाकले.
हे वाचा-वनिताच्या ३ ठसठशीत मंगळसूत्रांनी वेधलं लक्ष; देवदर्शनासाठी नवऱ्यासह कोकणात
डिनर डेटमुळे नेटकरी भडकले
दरम्यान यानंतर राखी आणि आदिलचा आणखी एक व्हिडिओ समोर आला. ज्यामध्ये दोघे एका हॉटेलमध्ये जेवताना दिसत असून, त्यांनी एकमेकांना घासही भरवला. विरल भयानी या पॅपाराझीने शेअर केलेल्या या ‘डिनर डेट’च्या व्हिडिओवर स्वत: राखीने कमेंट करत असे सांगितले की, ‘तो माफी मागायला आला होता, मात्र मी त्याला कधीच माफ करणार नाही’. अशाप्रकारच्या दुटप्पी वागण्यामुळे नेटकरी राखीला ट्रोल करत आहेत. ‘दोघांनी आधी ठरवा की तुम्ही एकत्र आहात की विभक्त होताय, सकाळपासून गोंधळात टाकलं आहे.’ अन्य एकाने लिहिले की, ‘देवाला माहीत यांचं सत्य काय आणि काय खोटं’. अनेकांनी राखीच्या या प्रकरणाची तुलना डेलिसोपशी केली आहे.
यानंतर राखीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला ज्यात ती म्हणताना दिसतेय की ती आदिलला रोज घरी जेवण भरवायची. तिने पुढे म्हटले की, ‘कदाचित मी त्याला हे शेवटचे भरवले. शत्रूही घरी आला तरी त्याला पाणी पाजतात, हा तर माझा नवरा आहे. मरेपर्यंत मी त्याच्यावर प्रेम करेन पण मी त्याला माफ करणार नाही.’