आदिलने पोटात लाथ मारली
राखीने आदिलवर मारहाणीचा आरोप करत म्हटलं की, त्याने तिच्या पोटात इतक्या जोरात लाथ मारली की तिचं मूत्रविसर्जन झालं. पापाराझींशी बोलताना राखी ढसाढसा रडली. रडत रडत ती जमिनीवर बसली आणि म्हणाली, ‘आदिलने माझ्या पोटात लाथ मारली. रडताना माझं मूत्रविसर्जन झालं. आदिल मला सोडून गेला. माझ्या आईला योग्य उपचार मिळाले असते. पण ज्या वेळी माझी आई शेवटच्या घटका मोजत होती, त्या वेळी तो त्या मुलीसोबत मजा करत होता. राखीने सांगितलं की, आदिल जेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत घरी आला तेव्हा त्याच्या संपूर्ण शरीरावर लव्ह बाईटच्या खुणा होत्या. ती त्याच्या पाया पडून विनवणी करत होती. मात्र त्याने तिला लाथेने धुडकावून दिलं.
राखीने तिच्या आईच्या मृत्यूसाठी आदिलला जबाबदार धरलं आणि तिच्यावर योग्य वेळी उपचार केले असते तर ती वाचली असती असं म्हटलं. २८ जानेवारीला राखीची आई जया सावंत यांचं निधन झालं. त्या दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होत्या. आईच्या निधनानंतर राखी पूर्णपणे एकटी पडली आहे. अशा नाजूक परिस्थितीत राखीचा संयम सुटला आणि ती जमिनीवर बसूनच रडू लागली. तिने म्हटलं, ‘आदिलने मला वेड लावलंय. मला कुठे तोंड दाखवायच्या लायकीचं नाही ठेवलं. माझ्या पैशांवर मजा करून झाली. मला भिकारी बनवलं. स्वतःच्या बायकोला रस्त्यावर आणलं.’ याआधी राखीने आदिलची गुन्हेगारी पार्शवभूमी असल्याचं देखील सांगितलं आणि तो दोन दिवस तुरुंगात राहून आल्याचं देखील म्हटलं.