जास्त वेळ फोनला चार्ज करू नका
स्मार्टफोन चार्ज करताना जास्त वेळ पर्यंत चार्ज करीत बसू नका. जर तुम्ही असे केले तर फोनला जास्त नुकसान होते. स्मार्टफोन कायमस्वरूपी डेड सुद्धा होवू शकतो. कारण, चार्जिंगचे थेट कनेक्शन स्मार्टफोनच्या मदरबोर्डशी असते. ज्यावेळी फोन चार्ज केला जातो त्यावेळी मदरबोर्ड हीट होत असतो.
ओरिजनल चार्जचा वापर करा
जेव्हाही तुम्ही स्मार्टफोनला चार्ज करीत असाल त्यावेळी नेहमी ओरिजनल चार्जरचा वापर करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्या फोनची बॅटरी खराब होण्याची भीती आहे. प्रत्येक स्मार्टफोनला चार्ज करण्यासाठी एक चार्जर बनवले आहे. त्याच चार्जरचा वापर तुम्ही करावा. चार्ज करण्यासाठी अन्य दुसऱ्या चार्जरचा वापर करू नये. अन्यथा नुकसान होईल.
चार्जिंगवेळी गेमिंग
जर तुम्ही स्मार्टफोनला चार्जरवर लावले असल्यास त्यावेळी जर गेमिंग खेळत असाल तर तुमच्या फोनवर परिणाम होवू शकतो. तसेच तुमचा स्मार्टफोन कायमस्वरूपी बंद पडू शकतो. याच कारणामुळे तुम्ही ज्यावेळी फोनला चार्जिंगला लावत असाल त्यावेळी गेम खेळू नका. या चुका टाळल्यास फोनचे आयुष्य नक्की वाढू शकते.