वीस वर्ष राजकारणात, वारकऱ्यांचाही पाठिंबा, अजितदादांनी चिंचवडचं तिकीट दिलेले नाना काटे कोण?

पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महविकास आघाडीकडून नाना काटे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चिंचवडमध्ये धक्कातंत्र वापरल्याचे पहायला मिळाले. या उमेदवारीने राहुल कलाटे अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची चिन्हे आता निर्माण झाली आहेत.

लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपकडून जगतापांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, महाविकास आघाडीकडून उमेदवारीबाबत चर्चा सुरू होती. त्यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानुसार आज महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कोण आहेत नाना काटे?

गेल्या वीस वर्षांपासून विठ्ठल (नाना) कृष्णाजी काटे हे राजकारणात सक्रिय आहेत. २००७ सालापासून महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहे. त्याही आधीपासून रहाटणी- पिंपळे सौदागर या परिसरासह संपूर्ण चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन ते करत होते.

महानगरपालिकेत सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून कार्यरत. आरक्षण पडल्याने २०१२ साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत नाना काटे यांच्या पत्नी शितल विठ्ठल काटे यांना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक मताधिक्याने येथील जनतेने निवडून दिले होते.

हेही वाचा : आमदारकीचे तिकीट मिळेल वाटलेलं पण… वहिनीची जाहीर खंत, बावनकुळे धीरज घाटेंच्या भेटीला

नाना काटे हे वारकरी संप्रदायाशी निगडित असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग चिंचवड शहरात आहे. २०१४ साली त्यांनी चिंचवड विधानसभा निवडणूक लढविली आहे. “चिंचवड शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक अशा प्रत्येक क्षेत्रात योगदान देण्याचा पूर्ण प्रयत्न आजवर केला आहे. नेहमीच विकासाला केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा प्रयत्न राहिला आहे. गेली वीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे” असं काटे सांगतात.

नाना काटे हे सुरुवातीपासून राष्ट्रवादीत आहेत. तसेच जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच नाना काटे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. उमेदवारी जाहीर झाल्याने चिंचवड मतदारसंघात निवडून येणारच असे नाना काटे यांनी खात्रीने सांगितले आहे.

हेही वाचा : काँग्रेसमधील पिता-पुत्राच्या हाती लवकरच ‘कमळ’, भाजपने बॉम्ब फोडला, १९ जणांची यादीच तयार

Source link

ajit pawarchinchwad ncp mahavikas aghadi candidateMaharashtra Political Newsnana katepune chinchwad bypollअजित पवारनाना काटेपुणे चिंचवड पोटनिवडणूकमहाविकास आघाडी उमेदवार चिंचवड
Comments (0)
Add Comment