हे वाचा-विशाखाची लाखमोलाची साडी; ज्या व्यक्तीने दिली भेट त्यांना भेटायचं राहून गेल्याची खंत
काय म्हणाल्या स्मृती ईराणी
मनोरंजन विश्वातून राजकारणात गेलेल्या आणि गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय मंत्रीपद स्मृती ईराणी यांच्याकडे आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आजतकनं आयोजित केलेल्या परिसंवादामध्ये स्मृती ईराणी सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना शाहरुख खान आणि त्याच्या पठाण सिनेमाविरोधाच बहिष्कार मोहिमेबाबत विचारले. त्यावेळी उत्तर देताना स्मृती यांनी सांगितलं की, ‘लोकांना एक गोष्ट माहिती नाही की, माझ्या मोठ्या मुलीचं नाव सुपरस्टार शाहरुख खान यानं ठेवलं आहे. माझे पती आणि शाहरुख यांची ३० वर्षे जुनी मैत्री आहे. शाहरुखबद्दल जे काही बोललं जात आहे, ते योग्य नाही आणि खरे देखील नाही.’
हे वाचा-राखीचा नवरा आदिल खानला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या! अभिनेत्रीनेच केलेली तक्रार
बॉयकॉट गँगला स्मृती यांचा सल्ला
स्मृती यांनी पुढं सांगितलं की, ‘कलाकारांचा आजही सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही कलाकावर वाईट कमेंट करणं योग्य नाही. बोलण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून काहीही बोलणं योग्य नाही. त्याचा गैरफायदा कुणीही घेता कामा नये. जर एखाद्या गोष्टीला विरोध करायचा असेल तर तो मर्यादेत राहूनच करायला हवा.’ स्मृती यांनी पुढं सांगितलं की, ‘आज प्रेक्षकांकडे खूप पर्याय आहेत. ते सिनेमागृहांत न जाता सिनेमा ओटीटीवरही बघू शकतात. सिनेमाचं कथानक दमदार असेल तर ते सिनेमा नक्की बघतात. जर एखादा सिनेमा चालला नाही तर त्याचा संबंध बॉयकॉट गँगशी जोडणं ही बरोबर नाही.’