तुफान आलया, सॅमसंग galaxy s23 ला रेकॉर्डतोड प्री-बुकिंग, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः Samsung Galaxy S23 series : भारतातील सर्वात मोठा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड असलेल्या सॅमसंगद्वारे, भारतात नव्याने लाँच केलेल्या Galaxy S23 सीरीजसाठी विक्रमी प्री-बुकिंग मिळाली आहे. अवघ्या २४ तासांत या फोनला १ लाख ४० हजारापेक्षा जास्त Galaxy S23 सीरीज युनिट्सची भारतात प्री-बुकिंग करण्यात आली आहे. म्हणजेच जवळपास १ हजार ४०० कोटी रुपयांच्या फोनची बुकिंग करण्यात आली आहे. सॅमसंगच्या फ्लॅगशिप फोनसाठी एक नवीन विक्रम आहे. सॅमसंगने आपल्या नवीन Galaxy S23 सीरीजसाठी, २ फेब्रुवारी रोजी देशातील ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरमध्ये प्री-बुकिंग सुरू केली होती.

किंमत आणि उपलब्धता
Galaxy S23 Ultra च्या १२ जीबी रॅम प्लस १ टीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १ लाख ५४ हजार ९९९ रुपये आहे. या फोनला फँटम ब्लॅक, क्रिम आणि ग्रीन रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. Galaxy S23 Ultra ला १२ जीबी रॅम प्लस ५१२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १ लाख ३४ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. Galaxy S23 Ultra च्या १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १ लाख २४ हजार ९९९ रुपये आहे. Galaxy S23+ फोनच्या ८ जीबी रॅम प्लस ५१२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १ लाख ४ हजार ९९९ रुपये ठेवली आहे.

वाचाः ChatGPT ला टक्कर देण्यासाठी गुगलचे Google Bard उतरले मैदानात, जाणून घ्या

या फोनला फॅंटम ब्लॅक, क्रिम या रंगात खरेदी करता येवू शकते. Galaxy S23+ च्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९४ हजार ९९९ रुपये आहे. Galaxy S23 च्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनला फँटम ब्लॅक, क्रिम, ग्रीन आणि लँवेडर या चार रंगात खरेदी करता येवू शकते. Galaxy S23 फोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७४ हजार ९९९ रुपये ठेवली आहे.

वाचाः स्मार्टफोन वापरताना या चुका कधीच करू नका, फोनचे होणारे नुकसान जाणून घ्या

Galaxy S23 Ultra चे प्री-बुकिंग करणारे ग्राहक Galaxy Watch4 LTE Classic आणि Galaxy Buds2 4,999 रुपयांच्या विशेष किमतीत मिळवू शकतात. तर, Galaxy S23+ चे प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ४,९९९ रुपयांच्या विशेष किमतीत Galaxy Watch4 BT घेण्याची संधी असेल. दरम्यान, व्हॅनिला गॅलेक्सी S23 मॉडेलची प्री-बुकिंग करणाऱ्या खरेदीदारांना ५,००० रुपयांची स्टोरेज अपग्रेड ऑफर मिळू शकते. याशिवाय सर्व ग्राहक ऑनलाईन चॅनेलवर ८,००० रुपयांच्या बँक कॅशबॅकचा देखील लाभ घेऊ शकतात.

वाचाः Valentine’s Day 2023 : स्वस्तात मिळताहेत शाओमी, रेडमी, ओप्पो आणि सॅमसंगचे स्मार्टफोन्स, पाहा ऑफर्स

सर्व स्पेसिफिकेशन्स पाहा

Source link

samsung galaxy s23 bookingsamsung galaxy s23 pricesamsung galaxy s23 price in indiaSamsung Galaxy S23 seriesSamsung Galaxy S23 Ultraसॅमसंग गॅलेक्सी एस २३ सीरीज
Comments (0)
Add Comment