OnePlus 11 Price in India
Oneplus 11 च्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेच्या फोनला भारतात ५६ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले आहे. हँडसेटची प्री बुकिंग देशात आजपासून सुरू केली आहे. फोनचा ओपन सेल १४ फेब्रुवारी रोजी देशात सुरू केला जाणार आहे. हँडसेटला टायटन ब्लॅक आणि ग्रीन कलर मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.
वाचाः Jio आणि Airtel च्या टक्करमध्ये Vi चा बेस्ट प्लान, कमी किंमतीत महिनाभर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
OnePlus 11 Specifications
वनप्लस 11 5G मध्ये 6.70 इंच टचस्क्रीन डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. स्क्रीन QHD+ (1440×3216 पिक्सल) रिझॉल्यूशन ऑफर करते. डिस्प्लेचा डेनसिटी 525 पीपीआय आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी गोरिला ग्लास दिला आहे. वनप्लस 11 5G ला ८ जीबी व १६ जीबी रॅम ऑप्शन मध्ये भारतात उपलब्ध करण्यात आला आहे. स्मार्टफोन अँड्रॉयड 13 बेस्ड ColorOS 13.0 सोबत येतो. वनप्लस कंपनीचा पहिला फोन आहे. ज्याला चार वर्षापर्यंत अँड्रॉयड आणि पाच वर्षापर्यंत सिक्योरिटी अपडेट मिळतील.
वाचाः Valentine’s Day 2023 : स्वस्तात मिळताहेत शाओमी, रेडमी, ओप्पो आणि सॅमसंगचे स्मार्टफोन्स, पाहा ऑफर्स
OnePlus 11 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. हँडसेट मध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी, ४८ मेगापिक्सलचा सेकंडरी आणि ३२ मेगापिक्सलचे तीन सेन्सर मिळते. हँडसेटमध्ये सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वनप्लसच्या या फ्लॅगशीप फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वनप्लस 11 5G चे डायमेंशन 163.10 x 74.10 x 8.53 मिलीमीटर आणि वज़न 205 ग्रॅम आहे. कनेक्टिविटीसाठी वनप्लस 11 5G मध्ये वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन/एसी/एएक्स, जीपीएस आणि NFC सारखे फीचर्स दिले आहेत.
वाचाः तुफान आलया, सॅमसंग galaxy s23 ला रेकॉर्डतोड प्री-बुकिंग, पाहा किंमत-फीचर्स