OnePlus Pad Features
वनप्लसच्या नवीन टॅबलेट मध्ये ११.६१ इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले दिला आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज दिला आहे. टॅबलेट मध्ये बिल्ट इन ट्रॅकपॅड सोबत एक डिटॅच असलेला फोलियो दिला आहे. वनप्लस पॅड मध्ये स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो 7:5 आहे. तर स्क्रीन-टू-बॉडी रेशियो ८८ टक्के आहे. या टॅबलेटमध्ये क्वॉड स्पीकर सिस्टम दिले आहे. जी डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी एटमॉस सपोर्ट करतो. याशिवाय, वनप्लसने आपल्या पहिल्या टॅबलेट मध्ये स्टायलस सपोर्ट सुद्धा दिले आहे. टॅबलेट सोबत स्टायलस आणि चार्जर दोन्ही बॉक्स सोबत दिले आहे.
वाचाः OnePlus 11 5G : वनप्लस 11 5G ची भारतात जोरदार एन्ट्री, पाहा किंमत-फीचर्स
OnePlus Pad मीडियाटेक डायमेंसिटी 9000 प्रोसेसर सोबत येतो. यात १२ जीबी पर्यंत रॅम दिली आहे. याशिवाय, टॅबलेट मध्ये वनप्लसच्या दुसऱ्या डिव्हाइस सोबत डेटा शेअरिंग फीचर सुद्धा ऑफर केले जात आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्टँडर्ड वाय फाय हॉटस्पॉटच्या तुलनेत हे फीचर जास्त परिणामकारक आहे. टॅबलेटला पॉवर देण्यासाठी 9510mAh ची बॅटरी दिली आहे. जी 67W रॅपिड चार्जिंग सपोर्ट करते.
वाचाः तुफान आलया, सॅमसंग galaxy s23 ला रेकॉर्डतोड प्री-बुकिंग, पाहा किंमत-फीचर्स
वाचाः Jio आणि Airtel च्या टक्करमध्ये Vi चा बेस्ट प्लान, कमी किंमतीत महिनाभर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग